---Advertisement---

विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा

On: शुक्रवार, जुलै 7, 2023 6:47 PM
Pat Cummins
---Advertisement---

लींड्सच्या हेंडिग्ले स्टेडियमवर तिसरा ऍशेस सामना खेळला जात आहे. याठिकाणची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकलू असल्याचे दिसते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच कर्णधार पॅट कमिन्स याने विकेट्सचं पंचक नावावर केले. कमिन्सने या सामन्यात कर्णधारपदाला साजेसे प्रदर्शन केले, असे म्हणता येईल.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (England vs Australia) यांच्यातील ऍशेस मालिका सध्या ऑस्ट्रेलियाच्या बाजूला झुकलेली आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला असून संघ 0-2 अशा आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत हेडिंग्ले स्टेडियमवर इंग्लंडला जबरदस्त सुरुवात मिळाली. पण दुसऱ्या दिवशी इंग्लिश फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. बेन डकेत, हॅरी ब्रुक, जो रुट, मोईन अली आणि मार्क पुड या पाच विकेट्स पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नावावर केल्या. आपल्या कसोटी कारकिर्दीतल कमिन्सचे हा नवने कसोटी पंचक ठरले. कमिन्सच्या या प्रदर्शनानंतर इंग्लंडची धावसंख्या 8 बाद 167 होती.

इंग्लंडची धावसंख्या 199 असताना कमिन्सने स्टुअर्ट ब्रॉड () याच्या रुपात डावातील सहावी विकेट घेतली. कमिन्सने 18 षटकांमध्ये 91 धावा खर्च करून या 6 विकेट्स घेतल्या होत्या. डावातील शेवटची विकेट कर्णधार बेन स्टोक्सच्या रुपात गेली. टॉड मर्फीने त्याला वैयक्तिक 80 धावांवर बाद केले आणि पहिल्या डावात इंग्लंड संघ 237 धावांवर गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या जावात 26 धावांची आघाडी मिळाली. तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रलिलायने 60.4 षटकांमध्ये 263 धावा केल्या होत्या. इंग्लंडा मार्क वुड याने पहिल्या डावात आपल्या संघासाठी 11.4 षटकांमध्ये 34 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या होत्या.
(Pat Cummins took FIVE WICKET HAUL in the Headingley Test)

महत्वाच्या बातम्या –
एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा: वेदांत, सुदीप, साईराज यांची आगेकूच
तिसऱ्या कसोटीत घाबरला बेअरस्टो! क्रीझमध्येच थांबल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही लागले हसू, Video

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---