भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली असून तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू होईल. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स वनडे मालिकेसाठीही उपलब्ध नसेल. अशात ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा एकदा स्टीव स्मिथ संभाळताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या नेतृत्वाखाली यावर्षीच्या भारत दौऱ्यावर आला होता. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर कमिन्सला मायदेशात परतावे लागले. कमिन्सने त्याच्या आईची तब्येक ठीक नसल्याचे कारण देत मायदेश गाठला. कमिन्सची आई मारिया मागच्या मोठ्या काळापासून छातीच्या कर्करोगाशी झुंज देत होती. अखेर मागच्या आठवड्यात मारियाने अखेरचा श्वास घेतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील शेवटचा कसोटी सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियन संघाला ही दुःखद बातमी समजली.
आईच्या निधानानंतर कमिन्स वनडे मालिकेत पुन्हा संघाची कमान संभाळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार कमिन्स भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही उपलब्ध नसेल. आईच्या निधानानंतर कमिन्स अजून काही दिवस कुटुंबियांसोबत घालवणार आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांनी याविषयी माहिती दिली. मॅखडोनाल्ड म्हणाले, “पॅट भारतात परत येऊ शकत नाही. घरी जेकाही घडले तो अजूनही त्याच काळजीत आहे. या कठीण काळातून जाताना पॅट आणि त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
दरम्यान, कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत काही खास कामगिरी करता आली नाही. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व कमिन्सने केले आणि भारताने या सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवला. पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावा, तरु दुसऱ्या कसोटीत 6 विकेट्सने भारताला पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कर्णधारपद स्टीव स्मिथ (Steve Smith) याच्या हातात दिल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिये 9 विकेट्सने राखून विजय मिळवला. चौथ्या कसोटीसीठीही कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ स्मिथच्या नेतृत्वात खेळला आणि हा सामना अनिर्णित राहिला.
(Pat Cummins will not play in the ODI series against India as well. team will be led by Steve Smith)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL 2023: सलग पाचव्या सामन्यात आरसीबी पराभूत! रोमांचक सामन्यात दिल्लीचा 6 विकेट्सने विजय
धकधक हो रहा था! द्रविडला होते 12,500 किलोमीटरवर सुरू असलेल्या ‘त्या’ सामन्याचे टेन्शन