---Advertisement---

प्रो कबड्डी: पाटणा पायरेट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स सामना बरोबरीत

---Advertisement---

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटचा लेग पुणे येथे खेळला जात आहे. लेगच्या पाचव्या दिवशी पहिला सामना पटणा पायरेट्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात झाला.

हा सामना २९-२९ असा बरोबरीत सुटला. बेंगळुरू बुल्स आपल्या प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न पटणा पायरेट्स संघाने हाणून पाडला. तर पुन्हा प्ले ऑफ लढतीपूर्वी लयीत येण्याच्या पाटणाच्या आशांवर पाणी फेरले.

पटणाने नाणेफेक जिंकून प्रथम बंगलुरू बुल्सला रेड करण्यास आमंत्रित केले. ही लढत प्रदीप नरवाल विरुद्ध रोहित कुमार यांच्यातील होती. पहिल्याच रेडमध्ये रोहित कुमार पटणाच्या डिफेसन्चा शिकार बनला. तर दुसऱ्या बाजूला प्रदीपने पहिल्याच रेडमध्ये गुण मिळवला.

पहिल्या सत्रात दोन्ही संघ आपल्या रेडर्सच्या बळावर गुण मिळवायचा प्रयत्न करत होते. पहिले पाच मिनिट झाले तेव्हा पटणाकडे फक्त एक टॅकल पॉइंट होता तर बेंगळुरू बुल्सकडे एकही टॅकल पॉइंट नव्हता. बेंगलुरू बुल्सकडून डीफेन्समधील पहिला गुण दहाव्या मिनिटाला आला.

बाराव्या मिनिटाला जेव्हा दोन्ही संघ ७-७ अशा बरोबरीत होते तेव्हा पटणा पायरेट्सची शिंगाडेने रोहित कुमारला सुपर टॅकल केले आणि संघाला दोन गुणांची बढत मिळवून दिली.

त्यानंतर पंधराव्या मिनिटाला पुन्हा एकदा पटना पायरेटसच्या डिफेन्सने रोहित कुमारला सुपर टॅकल केले आणि स्कोर पटणा पायरेट्स ११ बेंगळुरू बुल्स १० असा झाला.

अखेर सहाव्या मिनिटाला रोहित कुमारच्या दोन गुणांचा रेडने पायरेट्स ऑल आऊट झाले आणि बेंगलुरुला तीन गुणांची बढत मिळाली पहिला सत्रअखेर पटना पायरेट्स १६ गुणांवर होती तर बंगलुरू १८ गुणांवर होती. पाटणा पायरेट्सकडून रेडींग डिपार्टमेंटमध्ये प्रदीप नरवालने ६ गुण मिळवले तर मोनू गोयतने ४ गुण मिळाले.

दुसऱया सत्रातही बंगळुरू बुल्सने सामन्यातील आपला दबदबा कायम राखला. पटणाकडून मोनूने रेडमध्ये गुण मिळवण्याचा प्रयत्न केला पण प्रदीप नरवालची चांगली साथ मिळाली नाही.

बाराव्या मिनिटाला मोनुच्या एका गुणाच्या रेडमुळे पाटणाने सामन्यात बरोबरी केली.

शेवटच्या काही मिनिटात बेंगळूर बुल्सने आपल्या डिफेन्सच्या बळावर पाटणा पायरेट्सची प्रदीप नरवाल आणि मोनूला बाद केले.

शेवटच्या २ मिनिटांमध्ये बेंगलोरकडे २ गुणांची बढत होती. पण मोनू गोयत रेडमध्ये गुण कमवत पाटणाला बढत मिळवून दिली. असे करताना त्याने त्याचा सुपर टेनही पूर्ण केला. पण शेवटच्या मिनिटात सुनील जयपालने बोनस गुण मिळवून सामना बरोबरीत आणला. ही रेड सामन्यातील महत्वपूर्ण ठरली आणि सामना बरोबरीत सुटला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment