प्रो कबड्डी २०२१ चा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून या स्पर्धेचे प्लेऑफ सामने सुरू आहेत. २३ फेब्रुवारी रोजी प्रो कबड्डीचे उपांत्य फेरी सामने झाले. यातील पहिला उपांत्य फेरी सामना ३ वेळच्या विजेत्या पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झाला. पटणा संघाने ३८-२७ गुणांच्या फरकाने सामना जिंकला आहे आणि अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
या सामन्यात पटणा संघ सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्यांनी पहिल्या हाफमध्ये यूपी योद्धांवर २३-९ अशी मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या हाफमध्येच त्यांचा विजय निश्चित झाला होता.
Now loading…⌛ 𝟜𝕥𝕙 ℙ𝕂𝕃 𝔽𝕀ℕ𝔸𝕃 😏
Aaj party kaha hai @PatnaPirates? 🥳#SuperhitPanga #VIVOProKabaddi #PATvUP pic.twitter.com/38QUBeLF9Z
— ProKabaddi (@ProKabaddi) February 23, 2022
Patna Pirates are through to another Pro Kabaddi League final.😍💥👇#pkl #pkl8 #VIVOProKabaddi #ProKabaddiLeague #Kabaddi pic.twitter.com/1Rh1jeSlzm
— Khel Kabaddi (@KhelNowKabaddi) February 23, 2022
महत्त्वाचे म्हणजे, प्रो कबड्डीच्या इतिहासात पटणा संघ सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. त्यांनी आतापर्यंत ६ वेळा प्रो कबड्डीच्या प्लेऑफ सामन्यांपर्यंत मजल मारली आहे. तर त्यापैकी ३ वेळा विजेतेपद जिंकले आहे. यंदाही त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली असल्याने हा संघ विक्रमी चौथे जेतेपद जिंकूनच हंगामाचा शेवट करणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रो कबड्डीचा अंतिम सामना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता होणार आहे. या सामन्यात पटणा पायरेट्सचा प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल?, हे आज ८.३० वाजता होणाऱ्या सामन्याच्या निकालावरून निश्चित होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितने सांगितला भारतीय संघाचा भविष्यातील कॅप्टन कोण?, वर्ल्ड कपसाठी ‘हा’ खेळाडू बसतो एकदम फिट
वॉटसनने सांगितला धोनी-विराटच्या नेतृत्त्वातील फरक, एकाला म्हणाला सुपर ह्युमन; रोहितबद्दलही भाष्य