---Advertisement---

स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात घेतला धक्कादायक झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; VIDEO एकदा पाहाच

---Advertisement---

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकादरम्यान इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत रोज एकाहून एक रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. नुकताच या स्पर्धेतील एक व्हिडिओ समोर आला. व्हिडिओत गोलंदाज स्वत:ला वाचवण्यासाठी एका हातानं धक्कादायक झेल घेताना दिसतोय. या कॅचनं सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो टी20 ब्लास्ट मध्ये खेळल्या गेलेल्या डरहम विरुद्ध लँकशायर सामन्यातील आहे. या सामन्यात पॉल कफलिन गोलंदाजी करत होता, तर फलंदाज मॅथ्यू हर्स्ट स्ट्राईकवर होता. त्यानं पॉल कफलिनच्या चेंडूवर समोरच्या दिशेनं जोरात फटका मारला. चेंडू सरळ कफलिच्या दिशेनं येत होता, ज्यापासून वाचण्यासाठी त्यानं हात वर केला.

कफलिननं जसा हात वर केला, तसा चेंडू त्याच्या हातात येऊन अडकला आणि फलंदाज झेलबाद झाला. कफलिनचा हा धक्कादायक झेल पाहून स्टेडियममधील सर्वच जण हैराण झाले होते. समालोचकांचाही यावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या तोडून शब्दच फुटत नव्हते. खुद्द फलंदाज हर्स्ट देखील हा झेल पाहून काही क्षणासाठी स्तब्ध झाला होता. तुम्ही या कॅचचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

डरहम विरुद्ध लँकशायर सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात डरहमनं 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. डरहमच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 218 धावा केल्या होत्या. संघाकडून ग्राहम क्लार्कनं 57 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 87 धावा ठोकल्या.

219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लँकशायरची टीम 217 धावाच करू शकली आणि डरहमचा 2 धावांनी विजय झाला. डरहमकडून कॅलम पार्किन्सनं शानदार गोलंदाजी करत 3 बळी घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

बांग्लादेशनं पुन्हा केली बेईमानी! डीआरएससाठी घेतली ड्रेसिंग रूमकडून मदत; अंपायरचीही साथ मिळाली
‘मॅन वर्सेस वाइल्ड’ फेम बियर ग्रिल्सनं हाती घेतली बॅट! क्रिकेटच्या मैदानावर केली जोरदार फटकेबाजी
बांग्लादेशच्या गोलंदाजाची नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की, BAN vs NEP सामन्यात मोठा राडा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---