---Advertisement---

बांग्लादेशच्या गोलंदाजाची नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की, BAN vs NEP सामन्यात मोठा राडा!

On: सोमवार, जून 17, 2024 11:41 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 चा 37वा सामना नेपाळ आणि बांग्लादेश यांच्यात किंग्सटाउन येथे खेळला गेला. या सामन्यात बांग्लादेशनं नेपाळचा 21 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान मैदानावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलचा बांग्लादेशचा युवा गोलंदाज तंझीम हसन शाकिबसोबत वाद झाला. तंझीमनं नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की केली आणि दोघांमध्ये बाचाबाचीही झाली.

नेपाळविरुद्धच्या सामन्यात तंझीम हसननं चांगली गोलंदाजी केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये 2 मेडन देताना अवघ्या 7 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र सामन्यादरम्यान त्याचा संयम सुटला आणि तो नेपाळच्या कर्णधाराशी भिडला.

ही घटना नेपाळचा संघ फलंदाजी करत असताना घडली. तंझीम बांग्लादेशसाठी डावातील तिसरं षटक टाकण्यासाठी आला. षटक पूर्ण होताच त्याची आणि नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल यांच्यात बाचाबाची झाली. दोघे एकमेकांना काहीतरी उद्देशून बोलले आणि त्यानंतर तंझीमनं रोहितजवळ येऊन त्याच्याशी धक्काबुक्की केली. दरम्यान, बांग्लादेशचे खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केलं. या घटनेचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

 

या सामन्यात बांग्लादेशच्या गोलंदाजांनी संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ 19.3 षटकांत अवघ्या 106 धावांवर ऑलाऊट झाला होता. मात्र प्रत्युत्तरात, नेपाळला 19.2 षटकांत केवळ 85 धावाच करता आल्या. या विजयासह बांग्लादेशचा संघ सुपर-8 साठी पात्र ठरला आहे.

बांग्लादेश सुपर-8 मध्ये भारताच्या गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे अन्य दोन संघ आहेत. या गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 22 जून रोजी अँटिग्वा येथे सुपर 8 चा सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सुपर-8 मध्ये भारताचा सामना कोणत्या संघासोबत कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
नेपाळला धूळ चारत बांग्लादेश सुपर 8 साठी पात्र, नेदरलँडचं स्वप्न भंगलं
बाबर आझमनं मोडला धोनीचा मोठा विक्रम, केन विल्यमसनलाही टाकलं मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---