T20 World Cupक्रिकेटटॉप बातम्या

नेपाळला धूळ चारत बांग्लादेश सुपर 8 साठी पात्र, नेदरलँडचं स्वप्न भंगलं

बांग्लादेशचा संघ 2024 टी20 विश्वचषकाच्या सुपर-8 साठी पात्र ठरला आहे. संघानं शेवटच्या साखळी सामन्यात नेपाळचा 21 धावांनी पराभव केला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ 19.3 षटकांत 106 धावांवरच ऑलआऊट झाला होता. मात्र, 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळला 19.2 षटकांत केवळ 85 धावाच करता आल्या. बांग्लादेशच्या विजयानंतर नेदरलँडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

नेपाळचा कर्णधार रोहित पौडेलनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशनं अवघ्या 30 धावांत 4 विकेट गमावल्या. टॉप ऑर्डरपासून मिडल ऑर्डरपर्यंत बांग्लादेशचे सगळेच फलंदाज फ्लॉप ठरले. संघाकडून अनुभवी शाकिब अल हसननं सर्वाधिक 17 धावा केल्या. नेपाळकडून चार गोलंदाजांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळनंही सातत्यानं विकेट गमावल्या. नेपाळचा निम्मा संघ केवळ 26 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र त्यानंतर कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंग ऐरी यांनी सहाव्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी करून कमबॅक केलं. मल्लानं 27 तर दीपेंद्रनं 25 धावा केल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर नेपाळचा पराभव निश्चित झाला.

बांग्लादेशकडून तनझिम हसन शाकिबनं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा देत 4 बळी घेतले. त्यानं 2 ओव्हर निर्धाव टाकले. याशिवाय मुस्तफिजुर रहमाननंही 4 षटकात अवघ्या 7 धावा देत 3 बळी घेतले. मुस्तफिजुरनं 19 वा ओव्हर मेडन टाकला आणि एक विकेटही घेतली.

या विजयासह बांग्लादेशचा संघ सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. सुपर 8 मध्ये बांग्लादेश गट 1 मध्ये असून, या गटात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

बाबर आझमनं मोडला धोनीचा मोठा विक्रम, केन विल्यमसनलाही टाकलं मागे
सुपर 8 मध्ये भारताला ‘या’ दोन संघांपासून सावध राहावं लागेल, माजी खेळाडूचा इशारा
“वादळ येण्यापूर्वीची शांतता…” कोहलीच्या फाॅर्मबद्दल ‘या’ दिग्गज खेळाडूनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

Related Articles