मुंबई । टी -20 क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज आहेत. एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता अशा खेळाडूंमध्ये आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत वेगवान शतके ठोकली आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली धावांचा पाठलाग करताना अनेक ऐतिहासिक खेळी साकारत संघाला विजय मिळून दिला आहे, म्हणून त्याला ‘चेस मास्टर’ असे देखील म्हटले जाते.
आज आम्ही तुम्हाला आयपीएल 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना ठोकलेल्या शतकाची माहिती देणार आहोत. हे शतक विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल सारख्या दिग्गज फलंदाजांनी ठोकले नव्हते. ही खेळी त्या खेळाडूच्या बॅटमधून साकारली गेली ज्याचे आयपीएल किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फारसे नाव नाही. त्या फलंदाजाच्या खेळीमुळे धोनीही स्तब्ध झाला होता, कारण हे शतक धोनीच्या संघाने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळले होते.
पॉल वल्थाटी असे या खेळाडूंचे नाव असून त्याने 2011च्या आयपीएलमध्ये तुफानी शतक ठोकले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धावांचा पाठलाग करताना वल्थाटीने शतक ठोकले होते.
धावांचा पाठलाग करत असताना ठोकलेले सर्वात मोठे शतक ठरले. मोहालीच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज पॉलने अवघ्या 63 चेंडूत नाबाद 120 धावा फटकावल्या, त्यामध्ये त्याने 19 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
नाणेफेक जिंकत पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतू हा निर्णय चेन्नईच्या फलंदाजांनी चुकिचा ठरवत २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या. मुरली विजय, एस बद्रिनाथ व एमएस धोनीने यात धुव्वांदार फलंदाजी केली होती. त्यानंतर पंजाबकडून वल्थाटी व ऍडम गिलख्रिस्ट सलामीला आले होते. एका बाजून सतत विकेट पडत असताना वल्थाटीने आपली धुव्वांदार फलंदाजी सुरुच ठेवली. शेवटी हा सामना पंजाबने १९.१ षटकांत १९३ धावा करत ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर कार्तिकने षटकार ठोकला होता. सामनावीर पुरस्कार अपेक्षेप्रमाणे वल्थाटीला दिला होता. कधीही हतबल न होणारा धोनी मात्र या सामन्यात काहीही करु शकला नाही.
आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवागने 119 धावांची खेळी केली होती. तर वॉटसनने नाबाद 117 धावा केल्या आहेत. जयसूर्याने नाबाद 114 आणि जयवर्धनेने नाबाद 110 धावांची खेळी केली. गिलख्रिस्ट आणि वॉर्नरनेही लक्ष्यचा पाठलाग करताना नाबाद 109 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कोहलीने 108 नाबाद खेळी साकारली आहे.
पॉल वॅल्थाटीमध्ये प्रतिभा होती, यात काही शंका नाही. पण त्याची कारकीर्द त्याच्या प्रतिभेनुसार घडली नाही. त्याने फक्त 5 प्रथम श्रेणी सामने खेळले. तसेच त्याला फक्त 4 अ दर्जाचे सामने खेळण्याची संधी मिळाली. टी -20 मध्ये त्याने केवळ 34 सामने खेळले. 2002 मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघातही त्याची निवड झाली होती. वल्थाटीने 2009 मध्ये राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवले होते. यानंतर तो 2011 ते 2013 पर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर राहिला.
तो शेवटचा आयपीएल सामना २०१३मध्ये, शेवटचा प्रथम श्रेणी सामना २०११, अ दर्जाचा सामना २०१२मध्ये खेळला. पुढे काही वर्ष तो एअर इंडियाकडून खेळला.
आज वल्थाटी 36 वर्षांचा आहे. सध्या तो होमग्राउंड क्रिकेट अकादमी चालवित आहेत.