---Advertisement---

पंजाबच्या ‘या’ शिलेदाराने बलाढ्य चेन्नईविरुद्ध झळकावले होते शतक, तरीही मिळाली नाही टीम इंडियात जागा

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 1:58 PM
Paul Valthaty
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग हा एक मंच आहे, जिथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसह अनकॅप खेळाडूंनाही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. आजवर बऱ्याच अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेले) खेळाडूंनी आयपीएलमधील खेळीच्या जोरावर राष्ट्रीय संघ निवडकर्त्यांना आकर्षित केले आहे.

परंतु एक असा भारतीय खेळाडू आहे, ज्याने वयाच्या २७ व्या वर्षीच आयपीएलमध्ये शतक झळकावले होते. परंतु त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे मात्र कधीही खुली झाली नाहीत. हा खेळाडू म्हणजे, ‘पॉल वॉल्थटी.’

आयपीएल २०११ मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात मोहाली येथे एक सामना रंगला होता. या सामन्यात पंजाबचे प्रतिनिधित्व करताना वॉल्थटीने ६३ चेंडूत नाबाद १२० धावांची धुव्वादार खेळी केली होती. या खेळीसाठी त्याने २ षटकार आणि १९ चौकार मारले होते.

याव्यतिरिक्त २००९ ते २०१३ या कालावधीत पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांचे वॉल्थटीने प्रतिनिधित्त्व केले होते. यावेळी एकूण २३ सामने खेळताना त्याने ५०५ धावा केल्या होत्या. यात शतकाखेरीज २ अर्धशतकांचाही समावेश होता. तरीही या खेळाडूसाठी भारतीय संघाची दारे नेहमीच बंद राहिली.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकूण १८ भारतीय खेळाडूंनी शतके केली आहेत. यातील वॉल्थटी हा एकमेव असा अनुभवी खेळाडू आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये शतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये वॉल्थटीबरोबर सचिन तेंडूलकर, विरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, ऋद्धिमान साहा, यूसुफ पठान, मुरली विजय, केएल राहुल, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांचा समावेश होतो.

या यादीत आता एक नविन नाव जोडले गेले आहे. ते नाव आहे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा धुरंधर देवदत्त पडीक्कल. या खेळाडूनेही अजून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत पाऊल ठेवलेले नाही. परंतु भविष्यात त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

गोलंदाजी करता येईना अन् फलंदाजीही जमेना, अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सवर बनलाय ओझं! 

चार सामन्यात ना षटकार ना अर्धशतक, मुंबईतील ‘या’ खेळाडूला डच्चू देण्याच्या मागणीने धरला जोर

अरेच्च्या! ‘मॅच विनिंग’ खेळीनंतर बुमराहला आली शंका, तपासली राहुलची बॅट; फोटो होतोय व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---