---Advertisement---

फिफा विश्वचषकात बेजांमिन पवार्डचा गोल ठरला रोनाल्डोपेक्षा भारी

On: गुरूवार, जुलै 26, 2018 8:17 PM
---Advertisement---

फ्रान्सचा फुटबॉलपटू बेजांमिन पवार्डचा अर्जेंटीनाविरुद्ध केलेला गोल फिफा विश्वचषकातील ‘सर्वोत्कृष्ठ गोल’ ठरला. बाद फेरीत त्याने हा गोल केला होता. हा सामना फ्रान्सने 4-3 असा जिंकला.

रशियात झालेल्या फिफा विश्वचषकातील 64 सामन्यात केलेल्या 169 गोलपैकी हा गोल स्पर्धेतील ह्युदांईमार्फत सर्वोत्कृष्ठ गोल ठरला.

ऑनलाईन करण्यात आलेल्या या मतदानामध्ये चाहत्यांनी क्रिस्तियानो रोनाल्डोला सोडून पवार्डला निवडले.

“माझ्याकडे बॉल आला तेव्हा मी विचार सुद्धा केला नव्हता आणि मी तो स्ट्रायकरने सांगितल्याप्रमाणे आल्या त्याच दिशेने पास करणार होतो. पण तो नेटमध्ये गेल्यावर मला खूप आनंद झाला”, असे 22 वर्षीय पवार्डने त्याचा ‘सर्वोत्कृष्ठ गोल’ घोषित झाल्यावर म्हटले.

तसेच स्पर्धेचा सर्वोत्कृष्ठ गोल करणारा पवार्ड हा युरोपातील पहिलाच खेळाडू आहे. त्याच्या बरोबरच कोलंबियाचा ज्युआन क्वीनटेरो याने जपान विरुद्ध आणि क्रोएशियाचा लुका मोड्रीच याने अर्जेंटिना विरुद्ध केलेले गोल अनुक्रमे दुसरे आणि तिसरे सर्वोत्कृष्ठ गोल ठरले.

महत्त्वाच्या बातम्या-

हा लघुपट सांगणार मँचेस्टर सिटीच्या विजेतेपदाचे रहस्य

ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे फिफा विश्वचषक २०२२पर्यंत प्रशिक्षक पदावर कायम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment