---Advertisement---

नारायणच्या खेळीचं रहस्य उलगडलं, बॅटमध्ये केली गडबड? ‘चीटिंग’ कॅमेऱ्यात कैद, VIDEO

On: बुधवार, एप्रिल 16, 2025 8:56 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये, जवळजवळ प्रत्येक सामन्यात फलंदाजांच्या बॅट चेक केल्या जात आहेत. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात हार्दिक पंड्याची बॅट देखील तपासण्यात आली होती, परंतु यामुळे पंचांना कोणतीही अडचण आली नाही. पण पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात सुनील नारायणच्या बॅटमध्ये काही दोष आढळून आला. मैदानात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या बॅटची तपासणी करण्यात आली आणि पंच गेजच्या मदतीने त्याच्या बॅटची रुंदी, खोली आणि कडा तपासताना दिसले

गेल्या सामन्यात सुनील नारायणने शानदार खेळी केली होती. त्याने सीएसकेविरुद्ध 44 धावांची दमदार खेळी केली. पंजाबविरुद्धही सर्वांच्या नजरा त्याच्यावर होत्या, पण त्याच्या बॅटमध्ये काहीतरी बिघाड होता. केकेआरकडून फलंदाजीसाठी नारायण आणि डी कॉक येण्यापूर्वी त्यांच्या बॅटची तपासणी करण्यात आली. जेव्हा पंचांनी नारायणच्या बॅटवर गेज लावला तेव्हा बॅटची जाडी जास्त असल्याचे दिसून आले, ज्यामुळे गेज पूर्णपणे आत गेला नाही. पंचांनी नारायणला ती बॅट वापरण्याची परवानगी नाकारली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, पंजाबच्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकात्याचे फलंदाज गडगडले. नारायण आणि डी कॉक लवकर डावाच्या दुसऱ्याच षटकात बाद झाले. रहाणे-रघुवंशीच्या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण चहलच्या फिरकीने सामन्याला कलाटणी दिली. चहलने 4, तर जॅन्सेनने 3 बळी घेतले. रसेलने अखेरपर्यंत झुंज दिली, पण शेवटी पंजाबने हा थरारक सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---