मुंबई । पंजाब क्रिकेट असोसिएशनने (पीसीए) मुल्लानपूरमधील नवीन स्टेडियमला पटियाला राज्याचे शेवटचा राजा, स्वामी. महाराजा यादवेंद्रसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. यादवेंद्र 1934 मध्ये भारताकडून 1 कसोटी सामना खेळले होते. तसेच त्यांनी 52 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. ते पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे वडील होते.
पीसीए अध्यक्ष राजिंदर गुप्ता आणि सचिव पुनीत बाली व अन्य केंद्रीय अधिकार्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाली म्हणाले की, “ही कल्पना पीसीए अध्यक्षांनी प्रस्तावित केली होती आणि ती मंजूर झाली.”
पीसीएने विद्यमान आयएस बिंद्रा स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या प्रक्रियेसही सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये रुपांतर होईल. नूतनीकरणानंतर येथे मैदाने, जलतरण तलाव, जिम व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचे बाली यांनी सांगितले.
मुल्लानपूरमधील 38.2 एकर स्टेडियमचे डिझाईन पीसीएचे माजी अध्यक्ष आयएस बिंद्रा यांनी केले होते. पीसीएने शिष्टमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या इतर अजेंडांपैकी करार केलेल्या क्रिकेटपटूंची संख्या 30 वरून 40 पर्यंत वाढवली. यामध्ये दहा महिला खेळाडूंचा समावेश आहे.
” या बैठकीचा मुख्य अजेंडा म्हणजे शिष्यवृत्ती योजना मंजूर करणे होय. जिल्हा विकास आराखडा राबविण्याच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली. या योजनेंतर्गत, पंजाबच्या 18 जिल्हा संघटनांनी विकासाचा अजेंडा सादर करावा लागेल आणि पीसीबीची तपासणी समिती या योजनेचा अभ्यास करेल. छोट्या-मोठ्या जिल्ह्यांसाठी अनुदान वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोरोना साथीच्या काळात काम करणारे कर्मचारी आणि मैदानी कामगारांना 40 हजार रुपयांचा बोनस दिला जाईल,” असे बाली यांनी सांगितले.
ट्रेंडिंग लेख –
अ दर्जाच्या क्रिकेटमधील ५ दिग्गज भारतीय खेळाडू, जे वनडे क्रिकेटमध्ये ठरलेत फ्लॉप
या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेट लीची भविष्यवाणी कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद
सचिन, गांगुली, सेहवाग नाही तर ‘या’ भारतीय फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करताना शोएब अख्तरला यायचे टेंशन
३० शतके आणि २५० विकेट्स घेणारा ‘हा’ खेळाडू गाजवणार रणजी क्रिकेट