पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषक 2023 च्या आयोजनाबाबत भारताला इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिया चषक (आशिया चषक 2023) बद्दल बरीच चर्चा सुरु आहे. कारण पीसीबी (The Pakistan Cricket Board) आणि बीसीसीआय (Board of Control for Cricket) हे दोन प्रमुख क्रिकेट बोर्ड आमने सामने आले आहेत. बीसीसीआयच्या मागणीमुळे आशिया चषक पाकिस्तानऐवजी यूएईमध्ये होण्याची पूर्ण शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नजम पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांच्याकडून बीसीसीला मोठा इशारा दिला गेल्याचे समोर येत आहे.
पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Former Chairman of PCB Ramiz Raja) यांनी बीसीसीआयला त्यांच्या निर्णयाचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिल्याचे सांगितले जात आहे. अशात बीसीसीआय आणि पीसीबीमधील वातावर अधिकच तापल्याचे दिसते. यावर्षी भारतात आयसीसी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघ आशिया चषक 2023 साठी पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर पाकिस्तान देखील वनडे विश्वचषकासाठी भारतात येणार नाही असे नजम सेठी यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. यापूर्वी पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा हे देखील असेच बोलले होते.
2023 आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांच्यात वाद सुरू आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah), जे आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष देखील आहेत, त्यांनी या आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानचा दौरा करणार नाही या आपल्या भूमिकेवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
PCB चे चेअरमन नजम सेठी यांच्या आग्रहामुळे बहरीन येथे आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) बैठक आयोजित करण्यात आली. आशिया कप 2023 च्या यजमानपदावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. माहितीनुसार आगामी आशिया चषक यूएईमध्ये खेळवला जाऊ शकतो. मागच्या वर्षीचा आशिया चषक कोरोना प्रतिबंधांमुळे याच ठिकाणी आयोजित काल गेला होता. आशिया चषकाच्या जयमानपदावरून पीसीबी आणि बीसीसीआयमध्ये रंगलेला वाद पाहून नेटकरी मात्र चांगलेच सक्रिय. सोशल मीडियावर मजेशीर मिम्स व्हायरल होत आहे.
Tell them there will be no issues here regarding network connectivity for their Online Head Coach Mickey Arthur
— Sarbojit Shome (@SarbojitShome) February 5, 2023
पीसीबी का ऐसे मजाक बन रहा है
ODI WC scenes:- pic.twitter.com/O2pu6x5D2d
— Ekansh Rai (@EkanshRai11) February 5, 2023
एक जवाब यह भी है
Good. South Africa qualified. And it’s a fair chance for Ireland and Zimbabwe to book their place in WC. Meanwhile, Pakistan will come in the end. You can’t fight with ICC. Pani me rahke magarmacch se bair mat karo.
— CHARLIE (@CharlieGulshan) February 5, 2023
समझ लें आप
Advantage Pakistan for not loosing a game against India in the world cup q
— Harsh Tegta (@tegtaharsh97) February 5, 2023
इस फोटो को पाकिस्तान के कई हालात से जोड़ा जा सकता है
— Swapna Maheswari (@SwapnaMaheswari) February 5, 2023
यह भी एक लहजा है
Baap ke ghar aane me darr kaisa
— Aniket Pandit (@Aniketpandey33) February 5, 2023
सीधा जवाब, नो बकवास
Mat aa bhai kisne bulaya
— Amit (@AmitMovieHolic) February 5, 2023
मिडिया रिपोर्टनुसार दिलेल्या माहितीनुसार, सेठी यांनी या बैठकीत शाह यांना इशारा दिला की, जर भारताने सप्टेंबरच्या स्पर्धेतून माघार घेतली तर पाकिस्तान ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार नाही. पीसीबीने यावर विशिष्ट आक्षेप घेतला. एसीसीच्या बैठकीत सेठीच्या कठोर भूमिकेने शाह यांना आश्चर्यचकित केले, असे देखील वृत्त आहे. दुसर्या अहवालात म्हटले आहे की, सेठीच्या भूमिकेमुळे जय शाह आश्चर्यचकित झाले कारण त्यांना अपेक्षित नव्हते. मार्चमध्ये आयसीसी आणि एसीसी कार्यकारी मंडळांची बैठक होऊन स्थळाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. (pcb and bcci war Indian cricketer fans raction after najam sethi warning to india about planning of asian cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शुभमन हा भारतीय क्रिकेटचे वर्तमान’, माजी भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य
‘भारत-पाकमध्ये युद्ध होईल’, मुशर्रफ यांनी भारतीय कर्णधाराला दिलेली चेतावणी; वाचा कारण