पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारी (27 ऑक्टोबर) नव्या हंगामासाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला 2024-25 हंगामासाठी केंद्रीय करार यादीत अ श्रेणीतून ब श्रेणीत पाठवले. तर वरिष्ठ खेळाडू फखर झमान, इफ्तिखार अहमद आणि ओसामा मीर यांना करार देण्यात आला नाही.
इंग्लंडविरुद्ध नुकतीच 2-1 अशी मालिका जिंकूनही कसोटी कर्णधार शान मसूद बी श्रेणीत कायम आहे. मंडळाने एकूण 25 खेळाडूंना केंद्रीय करार दिले आहेत. गेल्या वर्षी 27 खेळाडूंना करार देण्यात आला होता.
गेल्यावर्षीप्रमाणेच पीसीबीने तीन महिन्यांनी करार जाहीर केला. खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद इरफान खान आणि उस्मान खान या पाच खेळाडूंना प्रथमच केंद्रीय करारात स्थान दिले. त्यांना ड श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. बोर्डाने माजी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोनच खेळाडूंना अ श्रेणीचा करार दिला आहे.
पीसीबीने यावेळी अनेक मोठे निर्णय घेत, रिझवान याला वनडे व टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर, आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बाबर आझम याला संघातून वगळले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर बोर्डाने अनेक धक्कादायक निर्णय घेत या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलेला.
अ श्रेणी : बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान
ब श्रेणी: नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद
क श्रेणी: अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हारिस रौफ, नोमान अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील आणि शादाब खान.
ड श्रेणी: आमिर जमाल, हसीबुल्ला, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद इरफान खान, मोहम्मद वसीम जूनियर आणि उस्मान खान
महत्त्वाच्या बातम्या-
“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
रोहित शर्मानंतर कोण बनणार भारतीय कसोटी संघाचा कर्णधार? हे 3 खेळाडू शर्यतीत
“हे शाळेतल्या मुलांप्रमाणे खेळतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं उडवली टीम इंडियाची खिल्ली