ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पात्रता फेरीने स्पर्धेचा बिगुल वाजला असला तरी, सर्व चाहत्यांना 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) सामन्याची प्रतीक्षा आहे. क्रिकेटविश्वातील हे दोन्ही मातब्बर संघ ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी (MCG) येथे आमने-सामने येतील. या सामन्यासाठी अद्याप वेळ शिल्लक असला तरी, दोन्ही बाजूंनी वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (PCB Chairman Ramiz Raja) यांनी देखील भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला बाद करण्याची युक्ती पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला सांगितली आहे.
क्रिकेटजगतातील सर्वच चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची वाट पाहत असतात. मागील विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागलेला. तसेच, आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यातही पाकिस्तानने भारताला पराभूत केलेले. या पराभवांचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी एमसीजीवर उतरेल.
पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी थेट भारतीय कर्णधार रोहित शर्माला बाद करण्यासाठी आपण बाबर आझमला सल्ला दिल्याचे म्हटले. ते म्हणाले,
“विश्वचषकासाठी संघ ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी मी, काही निवड समिती सदस्य व बाबरला भेटलो. त्याला मी रोहितला कसे बाद करावे याबाबत सांगितले. माझ्या मते रोहितला शाहिन आफ्रिदीने वारंवार 100 मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करावी. तसेच यावेळी शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक असावा. सातत्याने इनस्विंग चेंडू टाकून त्याला हैराण करत त्याला बाद केले जाऊ शकते.”
शाहिन शाह आफ्रिदीने मागील विश्वचषकात भारताविरुद्ध घातक गोलंदाजी केली होती. रोहित शर्मासह केएल राहुल व विराट कोहली यांना बाद करत त्याने पाकिस्तानला सामन्यात पुढे केलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: धवनला न विचारताच वडिलांनी ठरवलं लग्न! वरून लेकालाच मारला जबरदस्त डायलॉग
धवनने ज्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये दिली नाही जागा, त्यानेच ठोकल्या 11 चेंडूत 62 धावा