क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी रायवलरी म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे पाहिले जाते. या उभय देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. मात्र, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येत असतात. आगामी विश्वचषकात देखील या दोन्ही संघांचा सामना होणार आहे. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ वनडे विश्वचषकासाठी भारतात आहे. पाकिस्तान संघाचे भारतात जल्लोषात स्वागत केले गेले. त्यानंतर भारावलेल्या अश्रफ यांनी म्हटले,
“भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने पाहण्यासाठी लोक आतुर असतात. ही एक मोठी स्पर्धा होते. मला वाटते की भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संबंध पुन्हा एकदा पूर्ववत होऊन त्यांच्या दरम्यान मालिका खेळल्या जाव्यात. गांधी-जिना ट्रॉफी म्हणून ही मालिका सुरू व्हायला हवी. याचा आम्ही बराच काळापासून विचार करत आहोत.”
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व पाकिस्तानचे पूर्व राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अली जिना यांच्या नावाने ही मालिका खेळवण्याचा प्रस्ताव अश्रफ यांनी दिला आहे. मात्र, बीसीसीआय व भारत सरकार याचा स्वीकार करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दर्शवला आहे. 2013 मध्ये अखेरच्या वेळी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. तर, भारतीय संघ 2006-2007 मध्ये अखेरच्या वेळी पाकिस्तानला गेलेला. आगामी विश्वचषकात 14 ऑक्टोबर रोजी सामना खेळला जाईल. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे हा सामना होईल.
(PCB Chief Zaka Ashraf Proposed Gandhi Jinnah Trophy Series Between India And Pakistan)
हेही वाचा-
जयस्वाल की जय! एशियन गेम्समध्ये ठोकले वादळी शतक, रिंकूचाही जलवा
सराव सामन्यात इंग्लंड पुढे बांगलादेश पस्त! टोप्ली-मोईनने गाजवली गुवाहाटी