आशिया चषक 2023 चा थरार सुरू झाला आहे. त्याचवेळी जगभरातील चाहते आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. मात्र, या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वीच एक मोठा वाद समोर आला असून, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बदनामी होत असल्याचे काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.
आशिया चषक स्पर्धेत खेळणाऱ्या संघांच्या जर्सीवर छापलेल्या आशिया कप लोगोच्या खाली यजमान देश पाकिस्तानचे नाव दिसत नाही. पाकिस्तान अधिकृतपणे आशिया कपच्या 16 व्या आवृत्तीचे आयोजन करत आहे. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील निम्म्याहून अधिक सामने श्रीलंकेत होत आहेत.
जेव्हा एखादा देश मोठ्या स्पर्धेचे आयोजन करतो तेव्हा सर्व संघांच्या जर्सीवर लोगोच्या खाली यजमान देशाचे नाव लिहिले जाते. मात्र, यावेळी जर्सीच्या लोगोखाली पाकिस्तान आणि श्रीलंका यापैकी कोणत्याही देशाचे नाव लिहलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि चाहते त्यांच्या क्रिकेट बोर्डावर नाराज असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ व मोहसीन खान यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कदाचित बीसीसीआय व जय शहा यांच्या दबावामुळे आशियाई क्रिकेट परिषद व पीसीबीने जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्याचा निर्णय घेतला असावा.”
2008 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला आशिया चषकाचे यजमानपद मिळाले आहे. तरीही, यजमान देशाचे नाव कोणत्याही संघाच्या जर्सीवर नाही. याबाबतचे स्पष्टीकरण देताना पीसीबीने सांगितले की, आशियाई क्रिकेट परिषदेने मागील आवृत्ती संपल्यानंतर निर्णय घेतला होता की, आता आशिया कपच्या कोणत्याही स्पर्धेत यजमान देशाचे नाव जर्सीवर छापलेल्या लोगोच्या खाली लिहिले जाणार नाही. एसीसीच्या या निर्णयाचे सर्व संघांनी पालन केले आहे.
(PCB Explain Why No Host Nation Name On Asia Cup Teams Jersey)
हेही वाचाच-
‘हा’ भारतीय ठेचणार बाबरच्या नांग्या, IND vs PAK सामन्यापूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी