पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष जका अश्रफ यांनी खुलासा केला आहे की, वर्ष २०१२ मध्ये डिसेंबर-जानेवारीमध्ये पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या शेवटच्या द्विपक्षीय क्रिकेट दौऱ्यासाठी पीसीबीने पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नींना भारतात पाठवले होते. जका अशरफ त्यावेळी पीसीबीचे अध्यक्ष होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंवर नजर ठेवण्याचा निर्णयही घेतला गेला होता.
जका अश्रफने (Zaka Ashraf) पाकिस्तान क्रिकेटला (Pakistan Cricket Board) सांगितले की, “माझ्यावेळी जेव्हा आमचा संघ भारत दौऱ्यावर (Pakistan Tour Of India) गेला होता. तेव्हा मी त्यांना सल्ला दिला होता की, खेळाडूंनी त्यांच्या पत्नींनाही सोबत घेऊन (Wives Of Pakistani Cricketers Sent To India) जावे. हा निर्णय त्यासाठी घेतला होता की, कोणताही वाद निर्माण झाला नाही पाहिजे. कारण भारतातील मीडिया नेहमीच याच्या शोधात असतो. खेळाडूंच्या पत्नींना पाठवण्यामागचे कारण खेळाडूंवर नजर ठेवणे हे होते. सर्व खेळाडूंनीही या योजनेचा अवलंबद केला होता आणि भारतात गेले होते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
“यादरम्यान प्रत्येक खेळाडू नियमाचे काटेकोर पालन करत होता. प्रत्येकवेळी जेव्हा-जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर जात होता, तेव्हा भारत देशातील लोक नेहमी आम्हाला फसवण्यासाठी आणि आमच्या खेळाडूंची व देशाची छबी खराब करण्याचा प्रयत्न करत असायचे. परंतु माझ्या या योजनेमुळे या गोष्टी टाळता येत होत्या,” असे जका अश्रफ पुढे म्हणाले.
पाकिस्तानने २०१२-१२ मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता. या दौऱ्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ३ वनडे आणि २ टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली होती. यातील टी२० मालिका १-१ ने बरोबरीत सुटली होती. तर ३ सामन्यांची वनडे मालिका पाकिस्तानने २-१ अशी जिंकली होती.
अश्रफ यांनी पुढे सांगितले की, “यानंतरही बीसीसीआयने भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत बोर्डाशी चर्चा केली होती. परंतु असे होऊ शकले नव्हते. दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजनितीक तणावामुळे या दौऱ्यानंतर उभय संघांमद्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळवली गेली नाही. भारत आणि पाकिस्तानात आता केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकात सामने खेळवले जातात.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त हार्दिक नव्हे हार्दिक २.० व्हर्जन म्हणा! गुजरात टायटन्सचा कर्णधार प्रत्येक विभागात दाखवतोय चमक
आर अश्विन का आला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला? संजू सॅमसनने केला खुलासा
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल हैदराबाद वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही