---Advertisement---

पीसीबीची माजी क्रिकेटर्सला खास ऑफर, पुन्हा करु शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी

On: शुक्रवार, जुलै 31, 2020 7:57 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी माजी क्रिकेटपटूंना सामना अधिकार्‍यांच्या (मॅच रेफ्री) पदासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. पीसीबीने 40 वर्षांखालील माजी खेळाडूंकडून 2020-21 हंगामासाठी कमीतकमी 50 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूंकडून अर्ज मागविले आहेत.

पीसीबीने म्हटले की, “निवृत्त खेळाडूंना पंच किंवा सामना रेफरी म्हणून करिअरच्या संधी खुल्या केल्या आहेत, स्थानिक क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवून त्यांना  पुढे जाता येते. यासोबत त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा देखील मार्ग मिळू शकतो.”

आयसीसीच्या एलिट पॅनल ऑफ मॅच रेफ्रीपॅनलमध्ये सध्या फक्त अलीम दार पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतात. अहसन रझा, शोबजा रझा, मोहम्मद असिफ याकूब आणि रशीद रियाज वकार आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये आहेत, तर आयसीसी मॅच रेफरीच्या एलिट वर्गमध्ये कोणतेही पाकिस्तानी नसले तरी आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये मोहम्मद अनीस आणि मोहम्मद जावेद मलिक यांचा समावेश आहे. यामुळेच आता पीसीबीला आपल्या माजी खेळाडूंना नोकरी द्यायची आहे, जेणेकरुन ते जागतिक क्रिकेटमध्येही नाव कमवू शकतील.

पीसीबीच्या घरगुती क्रिकेट सेटअपमध्ये माजी खेळाडूंचा सहभाग वाढविण्याच्या आणि खेळाच्या सर्व बाबींमध्ये स्थानिक कौशल्य प्रशिक्षित करण्यासाठी या संधींची निर्मिती करण्यात आली आहे.

पीसीबीचे नदीम खान म्हणाले की, “पाकिस्तान क्रिकेटने काही चांगले खेळाडू तयार केले आहे आणि आता त्यांचा वापर करण्याची वेळ आली आहे. एक क्रिकेटर खेळाचा प्रत्येक दृष्टिकोन समजतो. पीसीबी आमच्या पंच आणि मॅच रेफरीसाठी वेगवेगळे कोचिंग कोर्स तयार करेल आणि त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी काम करेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---