भारत आणि पाकिस्तान संघ आगामी आशिया चषकात आमने सामने येणार आहेत. उभय संघातील हा सामना २८ जुलै रोजी खेळला जाईल. आशिया चषक यूएईत खेळला जाणार असून दोन्ही संघ या स्पर्धेतील स्वतःच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करतील. पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांनी आशिया चषकासाठी संघ घोषित केला आहे. परंतु, पाकिस्तानचा एक असा खेळाडू आशिया चषक खेळणार नाहीये, जो भारताच्या फिरकी गोलंदाजांचा घाम काढू शतक होता.
मागच्या वर्षी पाकिस्तानने टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच भारतीय संघाला पराभूत केले होते. तत्पूर्वी पाकिस्तानने एकदाही टी-२० विश्वचषकात अशी कामगिरी केली नव्हती. यावर्षी भारतीय संघ या पराभवाची कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात असेल. असे असले तरी, पाकिस्तान संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघासाठी त्यांचे आव्हान सोपे दिसत नाही. पाकिस्तानचा युवा खेळाडू आझम खान (Azam Khan) आशिया चषकासाठी निवडला जाईल, अशी शक्यता होती. परंतु त्याला संधी मिळाली नाही. बुधवारी (१० ऑगस्ट) त्याचा वाढदिवस होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने एक खास ट्वीट करून त्याला शुभेच्छा दिल्या. चाहते आझमला आशिया चषकात संधी मिळावी, अशी मागणी करत आहेत.
🧢 Three T20Is for Pakistan
🏏 1,449 runs in T20 cricket at a strike rate of 144.17📹 Celebrate wicketkeeper-batter @MAzamKhan45's birthday by viewing some of his explosive shots in domestic cricket 🔥 pic.twitter.com/XfhzCOUhv5
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 10, 2022
आझम खान सध्या पाकिस्तान सुपर लीगमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने पाकिस्तानसाठी पदार्पण केले आहे, पण त्याला देशासाठी अद्याप चमकदार कामगिरी करता आली नाहीये. त्याने पाकिस्तानसाठी एकूण ३ सामने खेळले आहेत आणि त्यातील दोन डावांमध्ये ६ धावांचे योगदान दिले आहे. यापैकी एकदा तो नाबाद राहिला आहे. त्याची आकडेवारी राष्ट्रीय संघासाठी खास नसली, तरी त्याचे प्रदर्शन पाहून अनेकांना वाटते की, तो भविष्यातील पाकिस्तानचा मोठा खेळाडू असेल. पीएसएलमध्ये खेळताना त्याने अनेकदा धमाकेदार प्रदर्शन केले आहे.
आझम खानच्या एकंदरीत टी-२० कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने एकूण १४४९ धावा केल्या आहेत. या धावा त्याने १४४ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने केल्या आहेत. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट अजूनच सुधारतो. २०२० मध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध आझमचा स्ट्राईक रेट पीएसएल लीगमध्ये सर्वात जास्त म्हणजेच १५७ होता. आशिया चषकासाठी त्याची निवड होण्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या, पण निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नाहीये. अनेकांच्या मते आझम फिरकी गोलंदाजांना ज्या पद्धतीने खेळू शकतो, त्या तुलनेत वेगवान गोलंदाजांचा सामना करू शकत नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्या’ खेळाडूमध्ये भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनण्याचे सर्व गुण, न्यूझीलंडच्या महान अष्टपैलूचा दावा
बटलर-बेअरस्टोला जमलं नाही ते ‘या’ वीस वर्षाच्या पोरान करून दाखवलं
चेंडू षटकारासाठी बाउंड्रीपार जाणारच होता, पण हेटमायरने हवेत झेपावत पकडला झेल; पाहा तो अद्भुत कॅच