---Advertisement---

‘खेळाडूंनी संघाकडून खेळण्यासाठी भीक…’, विंडीज कोच सिमन्स यांनी असे का म्हटले? वाचा सविस्तर

On: गुरूवार, ऑगस्ट 11, 2022 2:25 PM
Phil Simmons
---Advertisement---

अनेक देशांमध्ये मागील काही वर्षांपासून टी२० लीग  (T20 League)सुरू झाल्या आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक खेळाडू वेस्ट इंडिजचे खेळताना दिसतात. हे खेळाडू देशाकडून खेळण्याऐवजी टी२० लीगमध्ये खेळण्याला अधिक प्राधान्य देतात. यावर वेस्ट इंडिज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू टी२० लीगमध्ये खेळतात आणि तेथे दुखापतग्रस्त होतात मग ते संघासाठी अनुपलब्ध राहतात. यामुळे ते टी२० विश्वचषकासाठी संघबांधणी करण्यास खूप मेहनत करावी लागत आहे, असेही मत सिमन्स यांनी मांडले आहे.

फिल सिमन्स (Phil Simmons) यांनी इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटले, “वेस्ट इंडिजचे खेळाडू संघासाठी नाहीतर टी२० लीगच्या फ्रॅंचायजीसोबत खेळण्याला अधिक महत्व देतात, हे पाहून दुख होते. यावर कोणता उपायही सूचत नाही. मात्र आपण काय करू शकतो? खेळाडूंनी आपल्या संघाकडून खेळण्यासाठी भीक मागीतली पाहिजे, असे माझे मुळीच म्हणणे नाही, मात्र त्यांनी स्वत:हूनच संघाकडून खेळण्याची तयारी दर्शवली पाहिजे.”

“सध्या काळ बदलत चालला आहे. खेळाडूंकडे वेगळ्या देशांत खेळण्याच्या संधी अधिक आहे. अशावेळी ते आधी त्यांना महत्व देत असेल तर आपण काही करू शकत नाही,” असेही सिमन्स यांनी पुढे म्हटले आहे. संघात अनुपस्थितीत असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची यादी मोठी आहे. आंद्रे रसेल हा निवडीसाठी उपल्ब्ध नव्हता, कारण तो द हंड्रेड (The Hundred) लीगमध्ये सुनील नारायणसोबत खेळत आहे.

मागील काही मालिकांमधील वेस्ट इंडिजची कामगिरी

एविन लुईस आणि ओशेन थॉमस हे फिटनेस टेस्टसाठी आले नाही, तर शेल्डन कॉट्रेल, फॅबियन एलन आणि रोस्टन चेस दुखापतीमुळे बाहेर आहेत. नुकतेच वेस्ट इंडिजने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध ४-१ अशी टी२० मालिका गमावली आहे. टी२० विश्वचषकाआधी वेस्ट इंडिज संघाला फक्त न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक चांगला संघ तयार करण्याची धडपड वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड करत आहेत.

मुख्य संघनिवड अधिकारी डेसमंड हेन्स यांनी रसेलबाबत म्हटले, “मला जी माहिती मिळाली त्यातून त्याने स्वत:ला संघासाठी उपलब्ध केले नाही. मला वाटते सगळ्या खेळाडूंनीच वेस्ट इंडिजसाठी खेळावे.”

वेस्ट इंडिज पुरूष संघाने २०१२ आणि २०१६मध्ये टी२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

कॅप्टन म्हणून सुपर किंग्समध्ये प्लेसिसचे पुनरागमन! राशिदही एमआय फॅमिलीचा सदस्य

व्वा पांडेजी! भारतीय संघातून बाहेर असलेल्या मनिषचा टी२० लीगमध्ये कहर, ठोकले झंझावाती अर्धशतक

आशिया चषकात राहुल नव्हे तर ‘हा’ असावा रोहितचा सलामी जोडीदार, दिग्गजाचा कामाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---