आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी गुरुवारी (15 सप्टेंबर) पाकिस्तानचा संघ घोषित झाला. विश्वचषकासाठी निवडलेला संघ पाहून अनेकजण पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि निवडकर्त्यांवर टीका करत आहेत. आशिया चषक 2022 मध्ये ज्या खेळाडूंना संघात घेतले गेले होते, बऱ्यापैकी तेच खेळाडू टी-20 विश्वचषकात देखील पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. अशात काही खेळाडू असे आहेत, ज्यांना आशिया चषकापाठोपाठ टी-20 विश्वचषकात देखील खेळण्याची संधी मिळाली नाहीये. यामध्ये दोन माजी कर्णधारांचा देखील समावेश आहे. संघ व्यवस्थापन या दोघांना संधी का देत नाही? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
शोएब मलिकला यावेळीही नाही मिळाली संधी –
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) याला संधी दिली गेली नाहीये. आशिय चषक 2022 (Asia Cup 2022) मध्येही शोएबला निवडले गेले नव्हते. त्याने पाकिस्तान संघासाठी अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे आणि संघाला विजय देखील मिळवून दिला आहे. शोएबने 20 नोव्हेंबर 2021 रोजी शेवटचा टी-20 सामना खेळला होता आणि त्यानंतर त्याला सतत संघातून वगळले जात आहे. त्याने आतापर्यंत 124 टी-20 सामन्यांमध्ये 31.22 च्या सरासरीने आणि 125.64 च्या स्ट्राईक रेटने 2435 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वात मोठी खेळी 75 धावांची होती. यादरम्यान त्याने 28 विकेट्स देखील घेतल्या आहेत. शोएबचे वज सध्या 40 वर्ष आहे, पण आजही फिटनेसच्या बाबतीत तो युवा खेळाडूंपेक्षा कुठेच कमी दिसत नाही. असे असताना विश्वचषक संघातून त्याला वगळल्यामुळे चाहते निवडकर्त्यांवर नाराज दिसत आहेत.
पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या कर्णधारालाही नाही मिळाली संधी-
शोएब मिलकव्यतिरिक्त जो दुसरा खेळाडू चर्चेत आहे तो म्हणजे माजी पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed). सरफराजच्याच नेतृत्वात पाकिस्तानने 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि भारत आमने सामने होते. पाकिस्तानने हा सामना तब्बल 180 धावांनी जिंकला होता. सरफराजने 22 नोव्हेंबर 2021 मध्ये पाकिस्तानसाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. कारकिर्दीत त्याने एकूण 61 टी-20 सामन्यांमध्ये 818 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 27.27 राहिली, तर स्ट्राईक रेट 125.26 चा होता. त्याच्या नावावर तीन टी-20 अर्धशतकांचाही समावेश आहे.
टी20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी , शान मसूद, उस्मान कादिर.
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकानंतर आता श्रीलंकेचे लक्ष्य टी20 विश्वचषकावर, संघच निवडलायं मजबूत
टी-20 विश्वचषकासाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा! क्रेग इर्विनचे कर्णधाराच्या भूमिकेत पुनरागमन
पंजाब किंग्जला मिळाला विश्वविजेता प्रशिक्षक, आयपीएल ट्रॉफीही केलीये नावावर






