पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी आपल्या खेळाडूंचा केंद्रीय करार जाहीर केला होता. परंतु पीसीबीने 20 ऑक्टोबर रोजी बदल करत पाच नवीन खेळाडूंच्या समावेशासह नवीन करार यादी जाहीर केली आहे. आता एकूण 30 खेळाडूंना केंद्रीय करार देण्यात आला आहे. याशिवाय, एक मोठा बदल करत, माजी पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदला डी श्रेणीतून ब श्रेणीमध्ये घेण्यात आले आहे.
नजम सेठी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जाहीर केलेल्या यादीत सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याला डी श्रेणीत पाहून अनेकांना आश्चर्य वाटले कारण त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. संघात परतल्यावर त्याने चांगली खेळी खेळली आणि अलीकडे तो देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपल्या बॅटने चांगली कामगिरी करत आहे.
पीसीबीचे नवनियुक्त अध्यक्ष झका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी कर्णधार बाबर आझम, (Babar Azam) मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक (Inzamam ul Haq) आणि संघ संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर समितीने सादर केलेल्या मागील कराराच्या यादीची पडताळनी केली आणि त्यात काही महत्वाचे बदल केले.
पीसीबीने आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सर्फराज अहमदच्या श्रेणीतील बदलाची माहिती दिली आणि सांगितले की, “माजी कर्णधार सर्फराज अहमदला यापूर्वी ‘ड’ श्रेणीत ठेवण्यात आले होते, मात्र आता त्याला ‘ब’ श्रेणीत घेण्यात आले आहे. तो सध्या कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने कसोटी संघात पुनरागमन केले आणि चार सामन्यांमध्ये 61.16 च्या सरासरीने 367 धावा केल्या. मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध चार डावात तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावल्याबद्दल 36 वर्षीय फलंदाजाला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरवण्यात आले होते.”
याशिवाय पाच नवीन खेळाडू अबरार अहमद, नोमान अली, आमिर जमाल, अर्शद इक्बाल आणि तय्यब ताहिर यांचा नवीन यादीत समावेश करण्यात आला आहे. नवीन करार यादीत अबरार अहमद आणि नोमान अली यांना सी श्रेणीत तर आमिर जमाल, अर्शद इक्बाल आणि तैय्यब ताहिर यांना डी श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
श्रेणी – अ – बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह आफ्रिदी,
श्रेणी – ब – फखर जमान, हारिस रऊफ, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान,
श्रेणी – क – अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, इमाद वसीम, नोमान अली
श्रेणी – ड – आमिर जमाल, अरशद इकबाल, फहीम अशरफ, हसन अली, इफ्तिकार अहमद, एहसानुल्लाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम ज्युनिअर, सैम अयूब, सलमान अली आगा, सऊद शकील, शाहनवाज दहानी, शान मसूद, तैय्यब ताहिर, उसामा मीर, जमान खान
PCB new contract announced big change in former captain ranks
हेही वाचा-
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर