ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र, भारतीय संघाचे सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंका येथे खेळले जाणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामनाही श्रीलंकेत खेळले जातील. आता स्पर्धेसाठी कमी अवधी शिल्लक राहिलेला असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) नवी मागणी केली आहे.
आशिया चषकाच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. आधी केलेल्या चर्चेच्या आधारावर पाकिस्तानमध्ये साखळी सामन्याचे चार सामने होतील. त्यानंतर श्रीलंकेत 9 सामने होतील. अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रवेश केल्यास हा अंतिम सामना श्रीलंकेत खेळला जाईल असे सांगण्यात आले आहे. आशिया चषकात एकूण 14 सामने खेळले जातील. यामध्ये साखळी फेरीनंतर, सुपर फोरचे सामने होणार आहेत. यानंतर अंतिम सामना खेळला जाईल.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या होणाऱ्या बैठकीत पीसीबी नवी मागणी करणार आहे. त्यानुसार पीसीबी चारपेक्षा अधिक सामन्यांचे आयोजन करण्याची परवानगी परिषदेकडे मागेल. आशिया चषक होणाऱ्या काळात श्रीलंकेत पावसाचा मोठा धोका आहे. त्यामुळे आणखी काही सामने पाकिस्तानात आयोजित करण्याची इच्छा पीसीबीचे नवे चेअरमन जका अश्रफ यांनी व्यक्त केली. सध्या आशिया चषकातील पाकिस्तानातील सामने केवळ मुलतान ते होण्याचे निश्चित झाले आहे.
हायब्रीड मॉडेल नुसार या दोन देशात होणारा आशिया चषक 31 ऑगस्ट 17 सप्टेंबर या कालावधीत होईल. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून, त्यांची दोन गटात विभागणी केली गेली आहे. यातील अ गटात भारत, पाकिस्तान व नेपाळ संघ असतील. तर, ब गटात गतविजेता श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान हे संघ आहेत.
(PCB Wants Host More Matches In Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
BANvsIND Womens । टी-20 मालिकेची डोकेदुखी वनडेत नको! हरमनप्रीत कौरला चांगल्या खेळपट्टीची अपेक्षा
वर्ल्डकपमधून अर्शदीपचा पत्ता कट? बीसीसीआयच्या ‘या’ निर्णयाने उपस्थित झाला प्रश्न