पाकिस्तान संघातील क्रिकेटपटूंना दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या खेळपट्टीवर अडचण येऊ नये म्हणून, पीसीबीने मोठा निर्णय घेतला आहे. फलंदाजांना आणि गोलंदाजांना मदत व्हावी म्हणून पीसीबी ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करणार आहे. ज्याची माहिती स्वतः पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांना दिली आहे.
देशातील खेळाडूंची गुणवत्ता वाढवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीज राजा यांनी घोषणा केली आहे की, कराची आणि लाहोरमध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळे पाकिस्तान संघातील खेळाडूंना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागणार नाही. त्यामुळे रमीझ राजाने आपल्या खेळाडूंना बाऊन्स-फ्रेंडली ट्रॅकची ओळख करून देण्यासाठी दोन ठिकाणी ड्रॉप-इन खेळपट्ट्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट पाकिस्तानच्या अहवालानुसार, पीसीबीने आरिफ हबीब ग्रुपसोबत करार केला आहे. पुढील वर्षापर्यंत हा गट पाकिस्तानला ३७ कोटी रुपयांमध्ये दोन ड्रॉप-इन खेळपट्ट्या उपलब्ध करून देणार आहे. एक ड्रॉप इन ट्रॅक कराचीच्या नजिमाबाद क्रिकेट स्टेडियममध्ये इंस्टॉल करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या ड्रॉप इन ट्रॅक लाहोरमध्ये इंस्टॉल करण्यात येणार आहे. परंतु लाहोरमध्ये ड्रॉप-इन ट्रॅक कुठे इंस्टॉल केला जाईल, हे अजूनही जाहीर करण्यात आलेले नाहीये.
पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांचे म्हणणे आहे की, “ड्रॉप इन खेळपट्टीमुळे घरगुती क्रिकेटपटूंना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूंना नक्कीच फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवरील अतिरिक्त उसळी आणि वेगाचा सामना करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला आहे.”
काय आहे ड्रॉप इन खेळपट्टी?
ड्रॉप इन खेळपट्टी कुठल्याही स्टेडियममध्ये इंस्टॉल करता येऊ शकते. जर क्रिकेटचे सामने खेळवायचे असतील, तर क्रेनच्या साहाय्याने खेळपट्टी इंस्टॉल करता येते. जर दुसरा खेळ खेळवायचा असेल तर ही खेळपट्टी काढता देखील येते.
महत्वाच्या बातम्या :
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय