Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“प्रियांक पांचाळकडे स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी” रोहित संघाबाहेर झाल्यानंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

रोहित संघाबाहेर झाल्यानंतर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

December 14, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit-Sharma-Priyank-Panchal

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. ही बातमी मिळताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. या संघाचे कर्णधारपद विराटकडे आहे, तर अजिंक्य रहाणेला उपकर्णधार पदावरून काढून ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली होती. परंतु, रोहित आता या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याचे चाहते भलतेच निराश झाले आहेत.

रोहित शर्मा संघाबाहेर झाल्यानंतर प्रियांक पांचाळला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तो आता भारतीय कसोटी संघात सामील झाला आहे. 

याबद्दल एका युजरने रोहितच्या दुखापतीबद्दल लिहिले की, “एक खेळाडू ज्याने गेल्या काही वर्षांपासून इतकी मेहनत घेतली आहे, इंग्लंड दौऱ्यावर देखील अप्रतिम कामगिरी केली.अचानक अशी बातमी मिळणे खरोखरच दुर्दैवी आहे. ही हृदयद्रावक बातमी आहे. आशा आहे की तो त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून लवकरच बरा होईल.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बीसीसीआयला संघात नेहमी असा खेळाडू हवा आहे. ऐकून खूप वाईट वाटले की, रोहित दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. प्रियांक पांचाललाही स्वतःला सिद्ध करण्याची एक चांगली संधी आहे.”

तर आणखी एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “रोहित शर्मा इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत विश्रांती केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवीन सुरुवात करायची होती. परंतु, दुखापतीमुळे अप्रतिम कामगिरी करण्याचे स्वप्न तुटले. आम्ही आशा करतो की, तो लवकरच ठीक होईल.”

Having played with him, I have seen his remarkable consistency and hunger for runs. But the best quality about @PKpanchal9 is that, he a great team mate. Congratulations young man. Finally you have got your opportunity. Best wishes for the tour. #priyankpanchal pic.twitter.com/HqCKBAUrrW

— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) December 13, 2021

Injured Rohit Sharma out of South Africa Test Series,#PriyankPanchal named replacement.
PriyankPanchal- CricketCarrier
1.First-Class -100 Matches
2.Scored over 7000 Runs 3.24 Centuries& 25 Fifties.
4. Best 314 not out. #IndvsSA #RohithSharma #HarnaazSandhu pic.twitter.com/xCJp6wFqaL

— Bikram Chattarjee (@BikramChattarj1) December 14, 2021

For someone who spoke so well about the work he put in for the England tour, the process he went through, the success he eventually he had, this must be a heartbreaking development. So unfortunate for Rohit Sharma & also worrying that it's hamstring.#SAVIND

— Vinayakk (@vinayakkm) December 13, 2021

Wishing you a speedy recovery @ImRo45 #Teamindia @BCCI always need you in Test squad but sad To hear that you have been ruled out by Test series against #SouthAfrica
Good luck to @PKpanchal9 it's a great chance for him to prove himself how good batsman's he is@BCCI #SAvsIND

— MD ABDUL RAZZAK (@MOHAMMA68626066) December 13, 2021

Feel sad for @ImRo45 ! He is India's Best Batsmen in England , Rested for Home series against NZ to be in fresh against SA , Looks all set to create magic again in SouthAfrica but untimely injury puts a break to his dream ! Get Well Soon RO ! Hope to see you in ODI's !! @BCCI

— Mohamed Azarudeen (@AmAzar93) December 13, 2021

Feel sad for @ImRo45 ! He is India's Best Batsmen in England , Rested for Home series against NZ to be in fresh against SA , Looks all set to create magic again in SouthAfrica but untimely injury puts a break to his dream ! Get Well Soon RO ! Hope to see you in ODI's !! @BCCI

— Mohamed Azarudeen (@AmAzar93) December 13, 2021

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

राखीव- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला

महत्वाच्या बातम्या :

‘अरे माझ्या कॉलेजच्या नोट्सही त्यातच राहिल्या…’, विमानात सामान विसरलेल्या क्रिकेटपटूचं आयसीसीकडे गाऱ्हाणं

माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा

“आपण ९ वर्षात अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकू”; बीसीसीआय अध्यक्षांनी तयार केला प्लॅन


Next Post
R Ashwin, Axar Patel & Team India

रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी 'हे' आहेत ३ पर्याय

VVS Laxman

लक्ष्मणच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाला, 'भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी काम करण्यास उत्सुक'

Photo Courtesy: Twitter/@mipaltan

सूर्यकुमारने आरसीबीविरुद्ध 'मै हू ना' सेलिब्रेशन? एक वर्षानंतर कारण उघड

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143