---Advertisement---

भारतीय संघाचा दिलदारपणा! कानपूर कसोटीनंतर आता वानखेडे स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनाही दिले मोठे बक्षीस

On: मंगळवार, डिसेंबर 7, 2021 2:33 PM
Wankhede-groundsman-Team-India
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (६ डिसेंबर) संपली. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ३७२ धावानी पराभव केला. या विजयासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीसोबतच मैदानावरील कर्मचाऱ्यांची मेहनत देखील मोलाची ठरली.

सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियम येथे खेळला गेला असून, मैदानावरील खेळपट्टी भारतीय संघाला जशी अपेक्षित होती, अगदी तशीच होती. मैदानावरील कर्मचाऱ्यांना केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत भारतीय संघाने सामन्यानंतर त्यांना बक्षीस दिले. (Indian Team Donate RS 35,000 Wankhede Stadium Groundsmen )

भारतीय संघाने या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांना ३५.००० रुपयांचे बक्षीस दिले आहे. भारतीय संघाने कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी ही आर्थिक भेट त्यांना दिली असल्याचे सांगितले गेले. माध्यमांतील वृत्तानुसार, मुंबईतील कसोटी सामन्यादरम्यान खेळपट्टी अशी नव्हती बनवली गेली होती, ज्यावर सामना तीन दिवसाच्या आधी संपणार नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कसोटी कर्णधार विराटसाठी एकत्रितरित्या खेळला गेलेला पहिला सामना होता. या दोघांनी त्यांच्या एकत्र प्रवासाची सुरुवात विजयाने केली आहे. (Rahul Dravid And Virat Kohli)

तत्पूर्वी, भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर देखील मैदानावरील कर्मचाऱ्यांना ३५,००० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली होती. त्यानंतर भारतीय संघाने आता ही परंपरा पुढे कायम केली आहे.

शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली कानपूरमध्ये पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अपेक्षित खेळपट्टीत तयार केली गेली होती. असे असले, तर भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. न्यूझीलंडचे तळातील फलंदाज अखेरपर्यंत टिकून राहीले आणि सामना अनिर्णीत केला होता.

न्यूझीलंड संघाने कानपूरमधील कसोटी सामन्यात कसाबसा पराभव टाळला होता. मात्र, मुंबईमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला. न्यूझीलंडसाठी एकट्या एजाज पटेलने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात १० बळी घेऊन हा सामना संस्मरणीय बनवला. दुसऱ्या डावात एजाजने चार तर रचिन रवींद्रने तीन बळी मिळवले.

भारतासाठी या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर मयंक अगरवालने उत्कृष्ट फलंदाजी केली. मयंकने पहिल्या डावात १५० आणि दुसऱ्या डावात ६२ धावांची महत्वाची खेळी केली‌. ज्यामुळे भारताने न्यूझीलंडवर मोठी आघाडी घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

अश्विनने सांगितलं आणि एजाजचं अनेक १० वर्ष रखडलेलं काम झटक्यात झालं

आयपीएल फ्रँचायझीच्या प्रशिक्षणाची सूत्रे हाती घेण्यासाठी शास्त्री सज्ज; म्हणाले, ‘मला १०० टक्के प्रशिक्षक…’

फक्त एजाज-रचिनच नव्हे, तर ‘या’ ४ भारतीय वंशाच्या क्रिकेटर्सने टीम इंडियाला टाकले आहे अडचणीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---