एखादी व्यक्ती जेव्हा कोणत्या शहराच्या प्रवासासाठी निघतो, तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत आवश्यक ते सर्व सामानही घेऊ जावे लागते; मग तो प्रवास बसचा असो वा ट्रेन अथवा विमानाचा. बऱ्याचदा तर घाईघाईत अनेकांचे सामान ते प्रवास करत असलेल्या वाहनातच राहिले असल्याचेही प्रकारही घडतात. परंतु जर कोण एखाद्या जवळच्या शहराव्यतिरिक्त दूरवर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी गेले असेल आणि तिथे त्यांचे महत्त्वाचे सामना राहिले तर… तेव्हा मोठ्या समस्या उपस्थित होतात. असेच काहीसे घडले आयर्लंडची महिला क्रिकेटपटी गॅबी लेविस (Gaby Lewis) हिच्यासोबत.
गॅबी ही आयर्लंड महिला क्रिकेट संघासोबत ओमान या परदेशाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी चुकून ती तेथील विमानात तिचे सामना विसरली (Gaby Lewis Forget Her Luggage) आहे. त्या सामानामध्ये तिच्या काही महत्वपूर्ण गोष्टीही होत्या. या गोष्टीला जवळपास १३ दिवस उलटले आहेत. परंतु अद्याप तिच्या सामानसंदर्भात कसलीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या गॅबीने थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसी( ICC) कडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
तिने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ट्वीट करत आयसीसीला आपल्या सामानासंदर्भात काही अपडेट आहेत का नाही? याची विचारपूस केली आहे. तिने ट्वीटमध्ये लिहिले की, ‘ओमानमध्ये माझे सामान राहिले आहे. या गोष्टीला १३ दिवस उलटून गेले आहेत. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्या सामानामध्ये माझ्या कॉलेजचे नोट्ससुद्धा होते.’
असे लिहित तिने पुढे रडतानाचे इमोजीही जोडले आहेत. यावरुन ही २० वर्षीय महिला क्रिकेटपटू आपल्या कॉलेज नोट्ससाठी किती चिंतित आहे, हे स्पष्टपणे दिसते. मात्र एका क्रिकेटपटूकडून आयसीसीला अशाप्रकारची मागणी होत असल्याचे पाहून क्रिकेटरसिकांचे मात्र त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. (Gaby Lewis Viral Tweet)
Any update on our luggage that’s still in oman @icc…… 13 days and counting, worst is I left my college notes in it 😭
— Gaby Lewis (@lewis_gaby) December 12, 2021
अनेकांनी तिच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत, आयसीसीला लवकरात लवकर तिचे सामान शोधण्याची मागणी केली आहे. तर अनेकांनी आयसीसीला ट्रोलही केले आहे. एका ट्वीटर वापरकर्त्याने तर, गॅबीला तिच्या या समस्येसाठी भन्नाट असा पर्यायही सांगितला आहे. सध्या सर्वत्र ऑनलाईन परिक्षा होत असल्याने तुला नोट्सची काय गरज आहे. इंटरनेटवर तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असा मजेशीर पण कामाचा सल्ला त्या ट्वीटर वापरकर्त्याने दिला आहे.
दरम्यान गॅबी ही एक अष्टपैलू क्रिकेटपटू असून तिने वयाच्या १३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत २२ वनडे आणि ४८ टी२० सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी सलामीवीराने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’; चार भारतीयांना मिळाली जागा
“आपण ९ वर्षात अनेक आयसीसी ट्रॉफी जिंकू”; बीसीसीआय अध्यक्षांनी तयार केला प्लॅन
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “कर्णधार म्हणून विराट रूटच्या खुप पुढे…”