पुणे १७ मे २०२२ – डायनामाईटस आणि घोरपडी तमिळ युनायटेड संघांनी पीडीएफएच्या द्वितीय श्रेणी लिगमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय मिळविले. दरमयान नॉईज बॉईज संघाने तृतीय श्रेणीत खडकीयन्स ब संघावर विजय मिळविला.
एसएसपीएमस मैदानावर झालेल्या सामन्यात डायनामाईटसने ड गटातील लढतीत सुखाई एफसीचा ५-० असा पराभव केला. अनिकेत बरसाखळे (१२वे, १३वे मिनिट) याने दोन, तर सार्थकने ३८व्या, सुनित गुप्तेने ४४व्या आणि रोहन मुळ्येने ५६व्या मिनिटाला गोल करून डायनामाईटसचा विजय साकार केला.
जी गटातील सामन्यात घोरपडी तमिळ युनायटेडने वानवडी स्पोर्टस क्लबचा ६-० असा धुव्वा उडवला. त्यांच्या विजयात रॉबिन पिल्ले (९वे आणि १२वे मिनिट) आणि कार्तिक काली (२५वे आणि ३८वे मिनिट) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. सॅमसन पिल्ले (२९वे मिनिट), नेहार पिल्ले (५२वे मिनिट) यांनी एकेक गोल करून आपला वाटा उचलला.
स.प. महाविद्यालयाच्या मैदानवार झालेल्या सामन्यात नॉईजी बॉईजने जाएंटस ब चे आव्हान ४-० असे सहज परतवून लावले. दिनेश राठोड याने २१, २३ आणि ४१व्या मिनिटाला गोल करून नोंदविलेली हॅटट्रिक त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. चौथा गोल अनुज कुटेने ५८व्या मिनिटाला केला.
ब गटातील सामन्यात खडकीयन्स ब संघाने मोमिनपुरा संघाचा प्रतिकार २-१ असा मोडून काढला. वैभव माहुले (३५वे, ५८वे मिनिट) याने दोन गोल केले. पराभूत संघाकडून सौद जावळी याने ४०व्या मिनिटाला एकमात्र गोल केला.
निकाल –
एसएसपीएमएस मैदान – ब गट –
चेतक एफसी ब २ (स्वराज १२वे, ५७वे मिनिट) वि.वि. एनडीए युथ स्पोर्टक क्लब ०
सी गट –
घोरपडी तमिळ युनायटेड ६ (रॉबिन पिल्ले ९वे, १२वे, कार्तिक काली २५वने, ३८वे, सॅमसन पिल्ले २० मिनिट, नेहार पिल्ले ५२वे मिनिट) वि.वि. वानवडी स्पोर्टस क्लब ०
गोल्फा बुशरेंजर्स (पुढे चाल) वि. संगम यंग बॉइज
उत्कर्ष क्रीडा मंच ब १ (गुणवंत पाटिल ३२वे मिनिट) वि.वि. राम स्पोर्टिंग ०
ग गट
अशोका इलेव्हन १ (प्रसाद भंडारी १८वे मिनिट) बरोबरी वि. युनिक वानवडी एफसी १ (व्हिवियन सुसाई २३वे मिनिट)
डायनामाईटस ५ (अनिकेत बरसाखळे १२वे, १३वे, सार्थक ३८वे, सुनित गुप्ते ४४वे, रोहन मुळ्ये ५६वे मिनिट) वि.वि. सुखाई एफसी ०
अ गट – एफसी बेकडिन्हो: 2 (जेम्स डिसूझा 7वा; सौरभ पाटील 35वा) वि.वि.सनी डेज एफसी: 0
एसएसपीएमस मैदान – १६ वर्षांखालील युवा लीग
ब गट –
बार्सा अकादमी ११ (हार्दिक शर्मा ८, १३, १४, २२वे मिनिट, नील दगडे १६वे, सिद्धेश कोरडे २५नवे, पकशाल २९वे, धीर नाडकर ३३वे, ६५वे मिनिट, जतिन गुलवाणी ३८वे, मानस घाड़गे ४१वे) वि.वि. ग्रीन बॉक्स चेतक ०
दक्ष एफ ए (पुढे चाल) वि. सिटी एफसी
सप महाविद्यालया -तृतिय श्रेणी
ई गट – नॉईजी बॉईज ४ (दिनेश राठोड २१, २३वे, ४१वे मिनिट, अनुज कुटे ५८वे मिनिट) वि.वि. जाएंटस बी ०
ब गट – खडकियन्स ब २ (वैभव माहिुले ३५वे, ५८वे मिनिट) वि.वि. मोमिनपुरा १ (सौद जावळी ४०वे मिनिट)
साई एफ ए (पुढे चाल) वि. परदेशी एफसी
सी गट – लौकिक एफए २ (रोहन सुनार २०वे मिनिट (पेनल्टी), अनिकेत बिरादार ५३वे मिनिट) वि.वि. देहू फीटर्स ०
सप महाविद्यालय. – तृतिय श्रेणी
एच गट – पीसीएच लायन्स २ (कुणाल येवले ३२वे, क्लाडेओ नॉंगपुल्ह ३३वे मिनिट) वि.वि. एफसी महाराष्ट्र ०
फ्रेंडस इलेव्हन (आदित्य कुलकर्णी ३६वे मिनिट, याकुश मिर्झा ५३वे मिनिट, सोहम माने ५५वे मिनिट) वि.वि. योद्धा एफसी २ (जावेद सय्यद ११वे मिनिट)
अ गट – सांगवी एफसी ब ० अनिर्णित वि. परशुरामियन्स ब ०
अ गट – नव महाराष्ट्र १ वि.वि. एफसी बेकडिन्हो ०
फोटो ओल
एफसी बेकडिन्हो (पिवळा) आणि सनी डेज एफसी (काळा)