Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“लोक म्हणतात तू विराटचे खूप कौतुक करतो, मी म्हणतो स्वतःला कसे रोखू?” – पाकिस्तानचा माजी दिग्गज

"लोक म्हणतात तू विराटचे खूप कौतुक करतो, मी म्हणतो स्वतःला कसे रोखू?" - पाकिस्तानचा माजी दिग्गज

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Cricketer-Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या टी-20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. विराट आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब काळ मागच्या वर्षी अनुभवा. पण आता त्याने स्वतःचा जुना फॉर्म पुन्हा मिळवल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विराटवर अनेक माजी दिग्गज कौतुकाचा वर्षाव देखील करत आहेत. अशात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेही खास प्रतिक्रिया दिली.

विराट कोहली (Virat Kohli) मागच्या वर्षी आशिया चषकातून आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. जवळपास तीन वर्षांनंतर विराटच्या बॉटमधून शतक आपल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर विराटने वनडे सामन्यांमध्येही काही शतके केली. असे असले तरी, कसोटी फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप अपेक्षित खेळी करता आली नाही. कसोटीत धावा करण्यासाठी विराट धावा करत असताना पाकिस्तानचा दिग्गज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने विराटचे कौतुक केले. अख्तरच्या मते विराट एवढा अप्रतिम खेळाडू आहे की, त्याचे कौतुक करण्यापासून तो स्वतःला रोखूच शकत नाही.

आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज खेळाडूंना घाम फोडणारा शोएब अख्तर रावलपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. असे असले तरी, अख्तर भारतीय दिग्गज विराट कोहलीची गुणवत्ता जाणतो. यापूर्वीही त्याने अनेक भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे. विराविषयी एका वृत्तावाहिनीवर अख्तरने खास प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचेही नाव घेतले.

अख्तर म्हणाला, “हे पाहा मला माझ्या मते सचिन तेंडुलकर जगातील सर्वोश्रेष्ठ फलंदाज आहे. पण कर्णधाराच्या रूपात त्याला यश आले नाही. त्याने स्वतःहून कर्णधारपद सोडले. मी माझ्या एका मित्रासोबत विराटविषयी चर्चा करत होतो. तेव्हा तो खराब फॉर्ममध्यो हेता आणि मी म्हणालो जेव्हा हा स्वतःच्या विचारांवर काम करेल, तेव्हा पुन्हा चांगले प्रदर्शन करेल. जेव्हा त्याचे डिके शांत झाले, तेव्हाच त्याने टी-20 विश्वचषकात धमाकेदार प्रदर्शन केले. असे वाटत होते की देवाने ही स्पर्धा फक्त विराटने पुनरागमन करावे यासाठीच आयोजित केली आहे.”

“तुम्ही हे पाहिले पाहिजे की, विराट कोहलीने जवळपास 40 शतके लक्ष्याचा पाठलाग करताना केली आहेत. लोक म्हणात तू विराटचे खूप कौतुक करतो. मी त्यांना म्हणत असतो कौतुक करण्यापासून स्वतःला कसे रोखू? एक वेळ होती, जेव्हा भारतीय संघ विराटच्या शतकांमुळेच जिंकत होता,” असेही अख्तर पुढे म्हणाला. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरू आहे. मायदेशातील या मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत असला, तरी कसोटी फॉरमॅटमध्ये त्याची बॅट अद्याप शांतच दिसत आहे.
(“People say you admire Virat a lot, I say how can I stop yourself?” – Former Pakistan legend)

हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सुपरमॅक्स क्रिकेट’मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण…
धोनी यावर्षी शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार? नेट सेशनमधील फलंदाजी पाहून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया


Next Post
Monkeygate-Scandal

Monkeygate Scandal: भारतीय खेळाडू, बीसीसीआय, कोर्ट आणि मीडियाला सांभाळत भज्जीला वाचवणारा 'डॉक्टर'

Smriti Mandhana

ऐतिहासिक सामन्यात स्मृती मंधानाच्या आरसीबीने जिंकली नाणेफेक, दिल्ली पहिल्यांदा करणार फलंदाजी

Bob-Woolmer

क्रिकेट कोचिंगला आधुनिकतेचा टच देणारे 'बॉब वूल्मर', पाकिस्तानचे हेड कोच असतानाच झालेला रहस्यमयी मृत्यू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143