---Advertisement---

निवृत्तीनंतर इरफान पठाणने केले मोठे भाष्य, म्हणाला…

On: रविवार, जानेवारी 5, 2020 3:20 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) शनिवारी (4 जानेवारी) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement from all cricket) घेत असल्याचे जाहीर केले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 कसोटी, 120 वनडे आणि 24 टी20 सामने खेळले आहेत.

यामध्ये त्याने कसोटीत 1105 धावा आणि 100 विकेट्स, वनडेत 1544 धावा आणि 173 विकेट्स आणि टी20 मध्ये 172 धावा आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत.

इरफानने निवृत्ती घेतल्यानंतर बोलताना म्हणाला की, “लोक 27-28 वर्षात आपल्या कारकीर्दीला सुरुवात करतात आणि माझी कारकीर्द तेव्हा संपुष्टात आली जेव्हा मी 27 वर्षांचा होतो. याचे मला दु:ख आहे.”

इरफान जेव्हा 19 वर्षांचा होता तेव्हा त्याने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) भारताकडून पहिला कसोटी सामना खेळला होता. इरफान आता 35 वर्षांचा आहे.

“27 वर्षांचा असताना मी 301 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतले होते. परंतु माझी कारकीर्द तिथेच संपुष्टात आली होती. मला याचं दु:ख आहे. मला असे वाटत होते की मी अजून खेळले पाहिजे आणि आपल्या विकेट्सची संख्या 500-600 पर्यंत पोहोचवू. त्याचबरोबर धावाही काढू. परंतु, असे काहीच होऊ शकले नाही,” असे इरफान यावेळी म्हणाला.

“2016 नंतर मला समजले की मी पुनरागमन करणार नाही. परंतु तेव्हा मुश्ताक अली ट्राॅफीत मी सर्वाधिक धावा केल्या होत्या. मी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होतो. त्याचबरोबर मी निवडकर्त्यांशी चर्चा केली तर ते माझ्या गोलंदाजीवर आनंदीत नव्हते,” असेही इरफान यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---