---Advertisement---

आपल्या खराब फॉर्मविषयी वॉर्नरने दिली प्रतिक्रिया; ‘असा’ करतोय सराव

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 11:23 PM
d warner aus
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ चा थरार सुरू झाला आहे. गट १ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपल्या फॉर्मबाबत वक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला. मात्र, वॉर्नरला फलंदाजीत फारसे काही करता आले नाही. १५ चेंडूत १४ धावा करून तो कागिसो रबाडाचा बळी ठरला. गेल्या पाच टी२० सामन्यातही त्याने फक्त एकदाच दुहेरी अंक गाठला आहे. यात १२ धावांची त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. मात्र, वॉर्नरला आपल्या खराब फॉर्मची फारशी चिंता नाही. तो म्हणतो, की लोक त्याच्या फॉर्मबद्दल बोलतात जे खूप मजेदार आहे.

हे फार मजेदार आहे

वॉर्नरने म्हटले की, आयपीएलदरम्यान अवघ्या दोन सामन्यांनंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यामुळे तो जास्त क्रिकेट खेळू शकला नाही. तो यापूर्वी आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळला होता. तसेच तो विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यांमधून बाहेर पडला होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी वॉर्नर म्हणाला, “मला खरोखर वाटते की लोक माझ्या फॉर्मबद्दल जे बोलत आहेत ते खूप मजेदार आहे. मी या प्रकरणावर हसतो कारण गेल्या काही दिवसांपासून मी खूप कमी क्रिकेट खेळलो आहे. उदाहरणार्थ आयपीएलमध्ये मला फक्त दोन सामने खेळता आले होते.”

अति वापरलेल्या खेळपट्ट्यांचा केला उल्लेख

सराव खेळपट्ट्यांच्या स्थितीमुळे आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल असे वॉर्नरला वाटत आहे. युएईमध्ये खूप क्रिकेट खेळले जात असल्यामुळे खेळपट्टीचा वापर बऱ्याच काळापासून होत आहे, असे त्याने सांगितले. वॉर्नर सध्या त्याची गती परत मिळवण्यासाठी सिंथेटिक विकेटवर सराव करत आहे आणि लवकरच तो आपला फॉर्म परत मिळवू शकतो. वॉर्नर म्हणाला, ‘अति वापर झाल्याने या खेळपट्टीवर सराव करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे. सध्या मी सिंथेटिक खेळपट्टीवर सराव करतोय. लय परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.”

ऑस्ट्रेलियाचा सुपर १२ गट १ मध्ये दुसरा सामना २८ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून जिंकला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---