-अनिल भोईर
आयपीयलनंतर भारतातील दुसरी लोकप्रिय लीग म्हणजे प्रो कबड्डी लीग. प्रो कबड्डी पर्व ६ चा लिलाल ३० मे व ३१ मे ला पार पडला. यंदाचा लिलाव कबड्डीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा लिलाव ठरला.
प्रो कबड्डीच्या मागच्या पर्वात युपी योद्धाने नितीन तोमरवर ९३ लाख रुपयांची बोली ही कबड्डीतील सर्वात मोठी बोली होती. पण यंदाच्या लिलावात हा रेकॉर्ड मागे टाकत कबड्डीत प्रथमच सहा खेळाडूंवर कोटींची बोली लागली. प्रो कबड्डीमध्ये कोटींची बोली लागणारा इराणचा फझल हा पहिला खेळाडु ठरला. तर दीपक हुडा कोटींची बोली लागणार पहिला भारतीय खेळाडू ठरला.
लिलावात लागणारी बोली ही त्या खेळाडूंची मागील कामगिरी, सध्याचा परफॉर्मन्स, खेळातील कौशल्ये यासर्व गोष्टीचा विचार करुन लावली जाते. यंदा ज्या खेळाडूंवर संघांनी कोटी रुपये मोजले त्या खेळाडूंच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर-
प्रो कबड्डी पर्व ६ मध्ये सर्वाधिक बोली लागणाऱ्या सहा खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी:
मोनू गोयात: १ कोटी ५१ लाख रुपये (हरियाणा स्टीलर्स)
मोनू गोयात यंदाच्या लिलावात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या प्रो कबड्डीच्या पाच पैकीं दोनच पर्वात खेळणार हा खेळाडू. दोन्ही पर्वात संघाचा दुसरा चढाईपटू म्हणून खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सगळ्याची मन जिंकली. प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंत मोनूने ३९ सामने खेळले असून चढाईत २५० गुणांसह एकूण २६५ गुण मिळवले आहेत. तो डुआॅरडाय रेडमध्ये संघाला गुण मिळून देण्यास पटाईत आहे.
राहुल चौधरी: १ कोटी २९ लाख रुपये (तेलुगु टायटन्स)
कबड्डीमध्ये पोस्टर बॉय म्हणून ओळख असलेला खेळाडू म्हणजे राहुल चौधरी. मोनूनंतर सर्वाधिक बोली लागला दुसरा खेळाडू राहुलला एफबीएम कार्डचा वापर करत तेलुगु टायटन्सने राहुल पुन्हा आपल्या संघात कायम केला. जेव्हा प्रो कबड्डी ६ ला सुरुवात होईल तेव्हा त्याचा नावावर आणखी एक विक्रम लिहिला जाईल. प्रो कबड्डीच्या सर्व पर्वात एकाच संघाकडून खेळणार एकमेव खेळाडू असेल.
प्रो कबड्डीमध्ये चढाईत सर्वाधिक ६६६ गुण मिळवणार खेळाडू आहे. आतापर्यंत ७९ सामने खेळला असुन एकूण ७१० गुण मिळवले आहेत. राहुलच्या नावावर सर्वाधिक एकूण ३२ सुपरटेन आहेत.
नितीन तोमर: १ कोटी १५ लाख रुपये (पुणेरी पलटण)
नितीन तोमर राष्ट्रीय स्पर्धा मध्ये सेनादल संघाचा प्रतिनिधित्व करणारा मुख्य चढाईपटू. एक चपळ चढाईपटू म्हणून ओळख असलेला नितीन तोमरने आतापर्यंत ४२ सामने खेळले असून चढाईत एकूण २७७ गुण तर एकूण २९२ गुण मिळवले आहेत.
दीपक हुडा: १ कोटी १५ लाख रुपये (जयपूर पिंक पँथर)
दीपकने मागील पर्वात पुणेरी पलटनला प्ले-ऑफमध्ये घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका पार पडली. एक मुख्य चढाईपटू असणारा दीपक चांगला पकडपटू आहे. आतापर्यंत दिपकने ८१ सामने खेळले असून एकूण गुणांच्या क्रमवारीत ५७७ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात ५१४ चढाईत तर ६३ पकडीत गुण आहेत.
रिशांक देवडिगा: १ कोटी ११ लाख रुपये (युपी योद्धा)
प्रो कबड्डीतील लोकप्रिय महाराष्ट्राचा खेळाडू म्हणजे रिशांक. १ कोटीच्या पेक्षा जास्त बोली लागणार महाराष्ट्राचा पहिला खेळाडू. ११ वर्षीनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळवून देणारा महाराष्ट्र संघाचा कर्णधार.
प्रो कबड्डीमध्ये रिशांकने आतापर्यंत ८० सामने खेळले असून चढाईत ४४९ गुण तर एकूण ४९० गुण आहेत. डु ओर डाय स्पेशालिस्ट रेडर म्हणुन त्याची ओळख आहे.
फजल अत्राचली: १ कोटी रुपये (यु मुम्बा)
प्रो कबड्डी मध्ये १ कोटींची बोली लागणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. फजल अत्राचली हा इराणचा खेळाडू असून उत्कृष्ट डावा कोपरा रक्षक आहे. प्रो कबड्डीमध्ये याने आपल्या पकडींनी चांगली छबी उमटवली आहे. तसेच १ कोटींची बोली लागणारा पहिला आणि एकमेव पकडपटू आहे.
प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंत ५६ सामने खेळला असून पकडीमध्ये १५२ गुण मिळवले आहेत. त्यामध्ये ११ हायफाय आणि १२ सुपरकॅचचा समावेश आहे.
कबड्डीच्या अन्य महत्त्वाच्या बातम्या-
–आरती बारी यांची मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणुन निवड
–मास्टर दुबई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ जाहीर
–प्रो-कबड्डी लिलावात महाराष्ट्राचे हे खेळाडू झाले मालामाल
–४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
–संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती