---Advertisement---

आज भारताकडून पदार्पण करणाऱ्या शिवम दुबेची अशी आहे कामगिरी

On: रविवार, नोव्हेंबर 3, 2019 7:21 PM
---Advertisement---

दिल्ली। भारत विरुद्ध बांगलादेश संघात आजपासून(3 नोव्हेंबर) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना आज अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून 26 वर्षीय शिवम दुबे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो भारताकडून टी20 मध्ये खेळणारा 82 वा खेळाडू ठरला आहे.

https://twitter.com/ICC/status/1190979904898322437

शिवमने याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना 8 सामन्यात 1 शतकासह 177 धावा केल्या आहेत. तसेच 5 विकेट्स घेतल्या आहेत.

मागीलवर्षी शिवमने रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईकडून बडोदा विरुद्ध खेळताना दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंगच्या षटकात पाच चेंडूत पाच षटकार मारले होते. त्याच्या या कामगिरीनंतर तो प्रकाश झोतात आला होता. त्यावेळी त्याने 60 चेंडूमध्ये 76 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने एकूण सात षटकार आणि तीन चौकार मारले होते.

विशेष म्हणजे शिवमने मुंबई टी20 लीगमध्ये प्रविण तांबेच्या गोलंदाजीवरही एकाच षटकात पाच षटकार खेचले आहे.

तसेच शिवमला यावर्षी आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने बेंगलोरकडून एकूण 4 सामने खेळले असून 40 धावा केल्या आहेत. त्याला बेंगलोरने आयपीएल लिलावात 5 कोटींची बोली लावत संघात घेतले होते.

त्याचबरोबर मोठे फटके मारणारा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवमने आत्तापर्यंत 16 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 1012 धावा आणि 40 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 35 सामन्यात 614 धावा आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर शिवमने आत्तापर्यंत ट्वेंटी20 चे 19 सामने खेळले असून यामध्ये त्याने 242 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---