---Advertisement---

बीबीएल विजेतेपदाचा मान पाचव्यांना पर्थ स्कॉचर्सकडे, थरारक सामन्यात षटकाराने केला शेवट

On: शनिवार, फेब्रुवारी 4, 2023 7:08 PM
Perth Scorchers
---Advertisement---

बिग बॅश लीगमध्ये शनिवारी (4 फेब्रुवारी) ब्रिस्बेन हीट आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. उभय संघांतील ही लढत खूपच रोमांचक ठरली. पर्थमध्ये खेळल्या गेलेलल्या या अंतिम सामन्यात पर्थ स्कॉचर्स संघाने विजय मिळवला आणि बीबीएलच्या इतिहासात पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.

ब्रिस्बेन हीट (Brisbane Heat) संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजीला आलेल्या पर्थ स्कॉचर्स (Perth Scorchers) संघाने पूर्ण प्रयत्न केले, पण विरोधी संघाच्या धावांवर लगाम लावू शकला नाही. ब्रिस्बेनने 20 षटकांमध्ये 7 बाद 175 धावा केल्या. नॅथन मॅकस्विनी (Nathan McSweeney) याने ब्रिस्बेनसाठी सर्वाधिक 41 धावा केल्या. तर सहाव्या क्रमांकावरील मॅक्स ब्रायंट (Max Bryant) याने अवघ्या 14 चेंडूत 31 धावा कुटल्या. पर्थ स्कॉचर्ससाठी जेसन बेहरेनडॉफ (Jason Behrendorff) आणि मॅथ्यू केली (Matthew Kelly) यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. (Brisbane Heat vs Perth Scorchers)

विजयासाठी पर्थ स्कॉचर्स संघाला 176 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 19.2 षटकात गाठले. पर्थ संघासाठी वाच्या क्रमांकावर कर्णधार एश्टन टर्नर (Ashton Turner) फलंदाजीला आला आणि त्याने अर्धशतक ठोकले. एश्टनने 32 चेंडूत 53 धावा कुटल्या. शेवटच्या षटकात पर्थ संघाला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती. यावेळी निक हॅबसन (Nick Hobson) आणि कुपर कॉलोनी  (Cooper Connolly) खेळपट्टीवर होते. निक हॉबसनने अवघ्या 7 चेंडूत 18 धावा कुटल्या आणि संघाला विजय मिळवून देण्याासठी शेवटचा षटकात देखील त्यानेच मारला. हॉबसनच्या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीबीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत पर्थ स्कॉचर्स पाच ट्रॉफींसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सिडनी सिक्सर्स संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत 3 बीबीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यानंतर एडिलेड स्ट्रायकर्स, सिडनी थंडर्स, मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट या संघाची नावे येतात. या सर्व संघांनी प्रत्येकी एक एक ट्रॉफी जिंकली आहे.

सर्वाधिक बीबीएल ट्रॉफी जिंकणारे संघ
5 – पर्थ स्कॉचर्स
3 – सिडनी सिक्सर्स
1 – एडिलेड स्ट्रायकर्स
1 – सिडनी थंडर्स
1 – मेलबर्न रेनेगेड्स
1 – ब्रिस्बेन हीट
(Perth Scorchers won the title of BBL 2023)

 

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी समजली ऑस्ट्रेलियाची मोठी कमजोरी, दिग्गजाकडून माहितीचा खुलासा
‘त्यांनी ठिणगी पेटवली, आता मजा येईल…’, वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ‘कांगारूं’ना अश्विनचे प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---