भारताला आज(18 डिसेंबर) ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 146 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. हा ऑस्ट्रेलियाचा आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील 999वा विजय ठरला आहे.
यामध्ये ऑस्ट्रेलियाने 816 कसोटी सामन्यांपैकी 384 सामने जिंकले आहेत. तर 557 वन-डे आणि 58 टी20 सामने जिंकले आहेत.
आतापर्यत कोणत्याच संघाने आतंरराष्ट्रीय स्तरावर 999 सामने जिंकलेले नाही. यामध्ये इंग्लंड 774 सामने जिंकत दुसऱ्या तर 710 सामने जिंकत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताने 149 कसोटी, 492 वन-डे आणि 69 टी20 सामने जिंकले आहेत. वन-डे मध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्यामध्ये भारत ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
तसेच आतंरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक सामने जिंकण्यामध्ये पाकिस्तान 702 सामने जिंकत चौथ्या आणि विंडीज 607 सामने जिंकत पाचव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहली-पेन वादाबद्दल बीसीसीआयने केला मोठा खुलासा
–शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू
–पाच चेंडूत पाच षटकारांची बरसात करणारा मुंबईकर झाला कोट्याधीश