मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरण क्रिकेट वर्तुळात चांगलेच गाजले. दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ही घटना घडली होती.
त्यानंतर या सामन्याचे अनेक व्हिडिओही वायरल झाले. यातील एक व्हिडिओमध्ये असे दिसत होते की आॅस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब मैदानावर जाण्याआधी वॉकी टॉकीवर तेव्हाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमान यांच्याशी बोलत होता. त्यानंतर तो या प्रकरणात दोषी आढळलेल्या कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टशी मैदानावर जाऊन काहीतरी बोलला.
तसेच या व्हिडिओत असेही दिसले की सँडपेपरवर बॅनक्रॉफ्ट चेंडू घासत आहे. त्यानंतर हँड्सकॉम्ब त्याच्याशी हसताना आणि बोलताना आढळला. त्यामुळे त्याच्यावर आणि लेहमन यांच्यावर बॅनक्रॉफ्टपर्यंत चेंडूशी छेडछाड करण्याचा संदेश पाठवल्याचा आरोप करण्यात आले होते.
परंतू आता हँड्सकॉम्बने Cricket.com.au शी बोलताना याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला, “हे खूप आश्चर्यकारक आहे ज्याप्रमाणे मिडियाने हा व्हिडिओ एडिट केला. यात दाखवले आहे की मी वॉकी-टॉकीवर बोलत आहे आणि त्यानंतर कॅमरॉनशी बोलायला गेलो आहे.”
“मला झेल घेण्यासाठी कॅमेरॉनच्या जवळ उभे केले होते. मी फक्त त्याच्यासोबत जोक करण्याचा प्रयत्न करत होतो. त्याव्यतिरिक्त त्यात काही नव्हते. त्यामुळे मी तिथे काहितरी करण्याचा प्रयत्न करत आहे असे भासवले गेले. पण असे काही नाही.”
मात्र हँड्सकॉम्बने लेहमनबरोबर काय संभाषण झाले याबद्दल काही माहीती दिली नाही. त्याने सांगितले की ते सर्व मी कागदोपत्री सांगितले आहे.
या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्याने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेविड वॉर्नरला 1 वर्षासाठी तर बॅनक्रॉफ्टला 9 महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून क्रिकेट आॅस्ट्रेलियाने निलंबित केले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताने दणदणीत विजय मिळवत दिला श्रीलंकेला व्हाइटवॉश
–तेव्हा धोनी गांगुलीला म्हणाला होता, दादा तुम्हीच कर्णधारपद सांभाळा!
–वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?