शुक्रवारी (27 जुलै) 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा एक डाव आणि 147 धावांनी पराभव करत दोन चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने श्रीलंकेला व्हाइटवॉश दिला आहे.
या सामन्यात श्रीलंकेला भारताने फॉलोआॅन दिला होता. त्यामुळे श्रीलंकेला सामना वाचवण्यासाठी 297 धावांची गरज होती. मात्र श्रीलंकेचा दुसरा डाव 150 धावांवरच संपुष्टात आला. या डावात श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही.
या डावात भारताकडून सिद्धार्थ देसाईने 40 धावात 4 विकेट्स घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी आयुष बडोणी (2/17), यतीन मंगवानी (2/9), अर्जून तेंडूलकर (1/39) आणि मोहित जांग्रा (1/33) यांनी विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 613 धावा करुन पहिला डाव घोषित केला. भारताकडून अथर्व तायडेने शतक तर पवन शहाने द्विशतक केले. तायडेने सलामीला येत 172 चेंडूत 177 धावा केल्या.
तसेच पवनने 332 चेंडूत 282 धावा केल्या. यात त्याने 33 चौकार आणि 1 षटकार मारला. या दोघांबरोबरच नेहाल वधेराने 64 धावांची खेळी केली आहे.
त्यानंतर भारताने श्रीलंकेचा पहिला डाव 316 धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून या डावात मोहित जांग्राने 4 तर आयुष बडोणी, यतीन मंगवानी आणि सिद्धार्थ देसाईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या डावात श्रीलंकेकडून पिसिन्दु सुरीयबंदाराने 236 चेंडूत 115 धावांची शतकी खेळी केली. तसेच सोनल दिनुशाने 51 धावा करत अर्धशतक केले.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: 8 बाद 613 धावा (घोषित)
श्रीलंका पहिला डाव: सर्वबाद 316 धावा (फॉलोआॅन)
श्रीलंका दुसरा डाव: सर्वबाद 150 धावा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–तेव्हा धोनी गांगुलीला म्हणाला होता, दादा तुम्हीच कर्णधारपद सांभाळा!
–वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’






