---Advertisement---

बिग बॅश लीगमधील ‘हा’ फिरकीपटू लवकरच दिसेल आयपीएलमध्ये, शेन वाॅर्न यांनी वर्तविले भाकीत

On: रविवार, जानेवारी 24, 2021 8:13 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत असून प्रचंड लोकप्रिय अशी बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. बिग बॅश लीग मध्ये क्रिकेट रसिकांना मोठ्याप्रमाणावर उत्कंठावर्धक सामने बघायला मिळत आहेत. या स्पर्धेत अनेक युवा व अनुभवी खेळाडूंना आपल्या कौशल्याची चुणूक दाखवायची संधी मिळते.

अशातच मेलबर्न रेनगेड्स कडून खेळणारा युवा फिरकीपटू पीटर हत्जोग्लूने देखील आपल्या गोलंदाजीने सर्व क्रिकेट रसिकांची वाहवा मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज शेन वॉर्न देखील हत्जोग्लूच्या गोलंदाजीने प्रभावित झाले असून, वॉर्न यांच्यामते त्याला लवकरच आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

शेन वॉर्न म्हणाले, “जगभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये पीटर हत्जोग्लू बद्दल चर्चा सुरू असेल. खासकरून आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तर नक्कीच. मला खात्री आहे की हत्जोग्लूला आयपीएलमध्ये निवडले जाईल कारण तो उत्तम गोलंदाजी करतो आहे. आयपीएल मधील अनेक संघ हत्जोग्लू वर लक्ष ठेवून असतील कारण भारतीय खेळपट्ट्यांमध्ये फिरकीपटूंना मदत मिळते.”

हत्जोग्लूने मेलबर्न रेनगेट्सकडून खेळताना 12 सामन्यात 8.48 च्या इकॉनमी रेटने तब्बल 16 बळी मिळवले आहेत. शेन वॉर्न सारख्या दिग्गज फिरकीपटूला प्रभावित केल्यामुळे हत्जोग्लूची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. त्याला आयपीएलमध्ये संधी मिळते की नाही हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.

महत्वाच्या बातम्या:

भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरला रिलीज करण्यास तामिळनाडू संघाचा नकार, हे आहे कारण

एकाच चेंडूवर फलंदाज दोनदा रन आउट? पाहा बिग बॅश लीगमधील धमाल व्हिडिओ

क्या से क्या हो गया! दहा दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा टीम पेन झाला वॉटर बॉय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---