२१ डिसेंबर रोजी सिडनी सिक्सर्स वि. ऍडलेड स्ट्राईकर्स (Sydney Sixers vs Adelaide Strikers) यांच्यात बीग बॅश लीग हंगामाचा १६वा सामना खेळवला गेला. ज्यात सिडनी सिक्सर्सने ४ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह सिडनी सिक्सर्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. हा त्यांचा ५ सामन्यांमधील चौथा विजय होता.
या सामन्यात एक क्षण असा आला की त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सिडनी सिक्सर्स फलंदाजी करत असताना ऍडलेड स्ट्राईकर्सचा कर्णधार पीटर सिडलने (Peter Siddle) डॅनियल वोरालला (Daniel Worrall) किस केलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
डॅनियल वोरालला त्याचं पहिलं षटक टाकत होता. तेव्हा पीटर सिडल त्याच्या जवळच क्षेत्ररक्षणासाठी होता. दुसरा चेंडू टाकण्याआधी सिडलने त्याच्या जवळ जाऊन त्याला किस केलं.
Lots of love at @StrikersBBL 😘 #BBL11 pic.twitter.com/3pZg8RjkRy
— 7Cricket (@7Cricket) December 21, 2021
या डावांत पीटर सिडल आणि डॅनियल वोराल दोघांनाही विकेट्स मिळाली नाही. सिडलची खूपच धुलाई झाली. त्याने ३.२ षटकांत ४० धावा दिल्या. यामुळेच संघाला पराभव पत्करावा लागला.
नाणेफेक जिंकून पहिले ऍडलेड स्ट्राईकर्सने २० षटकांत १४७-८ अशी धावसंख्या केली. ऍडलेड स्ट्राईकर्सकडून जोनाथन वेल्सने (Jonathan Wells) ३२, थॉमस केलीने (Thomas Kelly) ४१ धावा केल्या. सिडनी सिक्सर्सकडून सीन ऍबट (Sean Abbott) आणि डॅनियल ख्रिस्टियन (Daniel Christian) यांनी ३-३ विकेट्स घेतल्या.
A six to win it!! 🙌 #BBL11 pic.twitter.com/gWDHEj26KL
— KFC Big Bash League (@BBL) December 21, 2021
हेही वाचा- लहान मुलांचे अश्लील फोटो स्वतःजवळ ठेवायचा ‘हा’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, आता झालाय ४ वर्षांचा तुरुंगवास
लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सच्या सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. फिलिपीने (Josh Philippe) २३ धावा तर विन्सने (James Vince) २१ धावा केल्या. जॉर्डन सिल्कने (Jordan Silk) शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करत २४ चेंडूत ५ चौकारांसह ३६ धावा केल्या. त्यामुळे सिडनी सिक्सर्स ४ विकेट्सने विजयी झाला. स्ट्राईकर्सकडून राशिद खानने (Rashid Khan) ३ विकेट्स तर जॉर्ज गार्टनने (George Garton) २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
- विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! ‘८३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी, फोटो व्हायरल
- पुनरागमनाची आस! फॉर्ममध्ये परतण्यासाठी केकेआरचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम, व्हिडिओ व्हायरल
- आर्चरच्या दुखापतीबाबत आले मोठे अपडेट; आयपीएलसाठी असणार का उपलब्ध? वाचा सविस्तर