आयपीएलच्या 16व्या हंगामात शनिवारी (6 मे) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिल्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने 7 विकेट्सने विजय संपादन केला. या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व दिल्लीचा आक्रमक सलामीवीर फिल सॉल्ट यांच्या दरम्यान शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, सामना संपल्यानंतर दोघांनी गळाभेट घेत हा वाद संपवला.
The hug moment of Mohammad Siraj and Phil Salt.
What a beautiful picture! pic.twitter.com/BUjwwoHn0b
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 6, 2023
दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात विजयासाठी 182 धावांचे लक्ष्य मिळाले. कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि फिल सॉल्ट (Phil Salt) यांनी दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. पण पावर प्लेच्या पाचव्या षटकात सॉल्ट आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) एकमेकांशी भिडल्याचे दिसले. पाचव्या षटकातील हा चौथा चेंडू होता, जो पंचांनी वाईड दिला. त्याआधी षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर सॉल्टने लागोपाठ दोन षटकार मारले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सॉल्टने चौकार मारला होता. पहिल्या तीन चेंडूंवर धुलाई झाल्यानंतर चौथ्या चेंडूवर सिराजने सॉल्टसोबत वाद घातल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मध्यस्थी करत हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला.
सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू हस्तांदोलन करत असताना सिराज व सॉल्ट यांनी हा वाद संपवला. त्यांनी गळाभेट घेत हा वाद केवळ सामन्यापुरता असल्याचे दाखवून दिले. दोघांच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होतेय.
या सामन्याचा विचार केल्यास आरसीबीने विराट कोहली व महिपाल लोमरोर यांच्या अर्धशतकांमुळे निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 16.4 षटकांमध्ये 182 धावांचे लक्ष्य गाठले.
(Phil Salt And Mohammad Siraj Hug After Heated Scenes During Match DCvRCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल मिल गये! गांगुली-विराटने सामन्यानंतर केला हॅंडशेक, वादावर पडला पडदा
पथिरानाची कारकीर्द वाढवण्यासाठी धोनीने उचलले पाऊल! श्रीलंका क्रिकेट बोर्डाला केली ही विनंती