---Advertisement---

अबू धाबीच्या फलंदाजाने ११ चेंडूंत ठोकल्या ५८ धावा; गेलसह फलंदाजी करताना काढला गोलंदाजाचा घाम

On: सोमवार, नोव्हेंबर 29, 2021 9:30 AM
---Advertisement---

सध्या सर्वत्र अबू धाबी टी१० लीग स्पर्धच्या चर्चा सुरू आहेत. या स्पर्धेत जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. तसेच या स्पर्धेत रोज असा काही ना काही प्रकार घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतो. दरम्यान अबू धाबी आणि चेन्नई ब्रेव्स यांच्यात झालेल्या सामन्यात देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. फलंदाजाने तुफान फटकेबाजी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अबू धाबी विरुद्ध चेन्नई ब्रेव्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई ब्रेव्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा चेन्नई ब्रेव्स संघाचा सलग ८ वा पराभव आहे. अबू धाबी संघाचा विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज फील सॉल्ट याने आक्रमक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर दुसरीकडे ख्रिस गेलने देखील धावांचा पाऊस पाडला.

या सामन्यात अबू धाबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर चेन्नई ब्रेव्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद शहजादने ३० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा साहाय्याने ५३ धावांची खेळी केली होती. तर भाणुका राजपक्षेने ७ चेंडूंमध्ये १४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर चेन्नई ब्रेव्स संघाला १० षटकांअखेर ६ बाद १०७ धावा करण्यात यश आले होते.

फील सॉल्टची आक्रमक खेळी 
या धावांचा पाठलाग करताना अबू धाबी संघाकडून फील सॉल्टने अवघ्या २० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ७ षटकारांचा साहाय्याने सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली, तर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ३० धावांची खेळी केली. सॉल्ट आणि गेल यांनी मिळून ७१ धावांची भागीदारी केली. हा सामना अबू धाबी संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ते दोघे कठीण काळातून जात आहेत, पण…’, रहाणे-पुजाराच्या फॉर्मबद्दल फलंदाजी प्रशिक्षकांचे भाष्य

तू अशी जवळी रहा! विराटने शेअर केला ‘कपल पिक्चर’

लढवय्या साहावर नेटकरी खूश! चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---