सध्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेची धामधूम सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान संघ 200 हून अधिक धावा करत अनेक कीर्तिमान रचत आहेत. अशात जागतिक क्रिकेटमध्ये एक असा सामना झाला, जिथे अवघ्या 9 धावांवर संघ सर्वबाद झाला आणि 4 चेंडूत सामना संपला. हा कोणताही देशांतर्गत सामना किंवा गल्लीतील सामना नाहीये. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सामना होता. मात्र, जेव्हा तुम्ही धावफलक पाहाल, तेव्हा चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. या सामन्याची खास बाब अशीही आहे की, यादरम्यान एकही फलंदाज दहा धावांचा आकडा पार करू शकला नाही. तसेच, संपूर्ण सामना जवळपास 12 षटके चालला. यावेळी 6 फलंदाजांना एक धावही करता आली नाही.
कोणता होता सामना?
क्रिकेटमध्ये दररोज कोणता ना कोणता सामना खेळला जातो. प्रत्येक दिवशी नवीन विक्रमाची भिंत रचली जाते. तसेच, असे म्हणतात की, विक्रम हा मोडण्यासाठीच बनतात. मात्र, जेव्हा कोणताही लाजीरवाणा विक्रम बनतो, तेव्हा तो विक्रम कोणत्याही संघाला मोडायची इच्छा देखील होत नाही. असाच एक कीर्तिमान पुन्हा एकदा रचला गेला आहे. खरं तर, 1 मे रोजी फिलिपिन्स महिला विरुद्ध थायलंड महिला (Philippines Women vs Thailand Women) संघात खेळला गेला. फिलिपिन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना संघ 9 धावाच करू शकला. यावेळी त्यांनी फक्त 9 धावा करण्यासाठी 11.1 षटके फलंदाजी करावी लागली.
फिलिपिन्सकडून फलंदाजी करताना जॉन एंड्रियानोब आणि जोना एगुइद यांनी प्रत्येकी 2 धावांचे योगदान दिले. यानंतर जेनिफर अलम्ब्रोक आणि कॅथरीन बगाओइसान्स्ट यांनीही 2 धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला खातं खोलता आलं नाही. ऍलेक् स्मिथ, एप्रिल सक्विलन, जोएल गॅलापिनस्टसह सर्व फलंदाज शून्यावर बाद झाले. सामन्यात सर्वाधिक 17 चेंडूंचा सामना जोना एगुइद हिने केला. जेव्हा संघ सर्वबाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या 11.1 षटकात 9 धावा इतका होता. म्हणजेच थायलंड महिला संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा त्यांच्यापुढे विजयााठी फक्त 10 धावांचे आव्हान होते.
RESULTS | MATCH 6 | l 🇹🇭 v 🇵🇭 l T20i | | SEAGAMES 2023| | CAMBODIA |
Thailand Women V Philippines Women
THAILAND WOMEN WON BY 10 WICKETS
Scorecard https://t.co/XX4HYvtAsE#seagames2023🇰🇭 #letsgothailand🇹🇭 pic.twitter.com/oDw091S99p
— Cricket Thailand (@ThailandCricket) May 1, 2023
थायलंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्याकडून थिपाचा पुथावोंग (Thipatcha Putthawong) हिने 3 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच, ओनिचा कामचोम्फु हिने एकही धाव न देता 3 खेळाडूंना बाद केले. तसेच, एक विकेट बूचाथमने नावावर केली. इतर दोन फलंदाज धावा करण्याच्या प्रयत्नात धावबाद झाले. (philippines women vs thailand women team all out for 9 runs match over in 4 balls read here)
रोमांचक सामना
थायलंडकडून फलंदाजीला उतरलेल्या नन्नापत कोंचारोएंकाईने दोन चेंडूत 3 धावा केल्या. तसेच, नत्थाकन चंथम हिने 2 चेंडूत 6 धावा करून संघाला सामना जिंकून दिला. नत्थाकन हिने यावेळी एक चौकारही मारला. अशाप्रकारे त्यांनी आपल्या संघाला अवघ्या 4 चेंडूत सामना जिंकून दिला. हा शानदार विक्रम आहे. हा विक्रम कधी तुटेल की नाही, हे पाहावे लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादला धूळ चारल्यानंतर केकेआरचा कॅप्टन भलताच खुश; म्हणाला, ‘आम्ही जुगार खेळला…’
केकेआरसमोर सनरायझर्सची हाराकिरी! अखेरच्या षटकात 9 धावांचा बचाव करत चक्रवर्ती ठरला हिरो