वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (26 ऑक्टोबर) इंग्लंड संघ चांगलाच अडचणीत आला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गतविजेते इंग्लिश फलंदाज अक्षरशः गुडघ्यावर आले आणि 156 धावांवर संघ सर्वबाद झाला. यात फिरकीपटू आदील राशिद याची विकेट चर्चेचा विषय ठरली. त्याने ज्या नाटकिय पद्धतीने विकेट गमावली, ते पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.
श्रीलंकन संघाला या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय श्रीलंकन गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. अवघ्या 33.2 षटकांमध्ये इंग्लंड संघ सर्वबाद झाला. यात बेन स्टोक्स याने सर्वोत्तम 43 धावांची खेळी केली. आदिल राशिद याने नॉन स्ट्राईक एंडवर अगदीच नाटकिय पद्धथीने आपली विकेट गमावली. यष्टीरक्षक कुसल मेंडिस याने क्षणाचा विलंब न करता केलेला थ्रो राशिदच्या विकेटचे कारण ठरला. स्वतः गोलंदाज महिश थिक्षाणा हादेखील स्टंप्सवर चेंडू लागल्यानंतर आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. राशिदचे लक्ष अवघ्या काही क्षणासाठी दुसरीकडे असताना यष्टीरक्षकाने सांधलेल्या संधीसाठी त्याचे कौतुक होत आहेत. आयसीसीनेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/Cy3D4FnPUg2/?utm_source=ig_web_copy_link
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (कर्णधार/यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महीश थीक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका
महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीला अजूनही आपल्या खेळाडूंवर आत्मविश्वास; म्हणाला, ‘विश्वचषक आपलाच…’
‘इंग्लंडचे फलंदाज स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी…’ गतविजेत्यांची खराब फलंदाजी पाहून गंभीरची लक्षवेधी प्रतिक्रिया