---Advertisement---

जालीम नजर हटा ले! ‘त्या’ काकूच्या नजरेने भल्याभल्यांचे वेधले लक्ष, प्रतिक्रियांचा पडला पाऊस

On: शनिवार, मार्च 13, 2021 3:07 PM
---Advertisement---

नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे शुक्रवार (१२ मार्च) रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला टी२० सामना पार पडला. या सामन्यात ८ विकेट्सने भारताला चितपट करत इंग्लंडने मालिकेची दमदार सुरुवात केली. मात्र या सामन्यापेक्षा जास्त स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका काकूने सर्वांचे लक्ष वेधले. सध्या सोशल मीडियावर त्या काकूची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय संघाच्या डावावेळी खासकरुन श्रेयस अय्यर फलंदाजी करत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते मोठमोठ्याने जल्लोष साजरा करत होते. त्यामुळे चाहत्यांच्या जल्लोषाची झलक टिपण्यासाठी कॅमेरामन त्यांच्यावर कॅमेरा फिरवत होता. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका सुंदर मुलीची कॅमेरामनने छबी टिपली. त्या मुलीच्या बाजूला एक काकूही उभ्या होत्या.

सोशल मीडियावर त्यांचा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. फोटोमध्ये त्या काकू तिरक्या नजरेने कॅमेराकडे पाहताना दिसत आहेत. अनेकांनी त्या काकू त्या मुलीची आई असाव्यात असे कयास लावत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्यांच्या चेहऱ्यांवरील हावभावांला पाहून कॅमेरामनची पुन्हा त्यांच्या मुलीवर कॅमेरा फिरवण्याची हिम्मत होणार नाही, असे काहींनी म्हटले आहेत. तर काहींनी जालीम नजर हटा ले,  सरकारी नोकरी असेल तरच कॅमेरात पाहा, अशा विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/SambitKar16/status/1370407996849815561?s=20

https://twitter.com/VVMparody/status/1370399958172454913?s=20

https://twitter.com/HashtagAnant/status/1370434241486458880?s=20

https://twitter.com/satyamvasistha/status/1370426673091416068?s=20

https://twitter.com/SarcasticVibs/status/1370410411988713473?s=20

भारतीय संघाची वाईट सुरुवात

पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय खेळाडूंनी निराशादायी प्रदर्शन केले. कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर रोहित शर्माला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारताचे सलामीवीर ५ धावाही करु शकले नाहीत. विराट तर भोपळाही न फोडता माघारी परतला. यष्टीरक्षक रिषभ पंतने काही लक्षणीय फटके मारले. पण तोही २३ चेंडूत २१ धावा करत पव्हेलियनला परतला. अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही अवघ्या १९ धावा केल्या.

श्रेयस अय्यरने एकट्याने एकाकी झुंज दिली आणि ४८ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याच्या कामगिरीमुळे भारताने इंग्लंडपुढे १२५ धावांचे लक्ष्य उभारले. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी १५.३ षटकातच २ विकेट्स गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. यासह ८ विकेट्सने सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारी नोकरी असेल तरच कॅमेरात पाहा!! स्टेडियममधील ‘त्या’ सुंदरीवर खिळल्या सर्वांच्या नजरा, होतेय ट्रेंड

इंग्लिश गोलंदाजांकडून भारतीय सलामीवीरांना गुलीगत धोका, पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की

1st T20: इंग्लंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, ‘हे’ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---