---Advertisement---

आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन, Photoतून तुम्हीही घ्या आनंद

On: सोमवार, मे 30, 2022 4:38 PM
Gujrat-Players-Celebration
---Advertisement---

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्स संघासाठी आयपीएल २०२२चा हंगाम अतिशय खास राहिला. गुजरात संघाने संपूर्ण हंगामात दमदार प्रदर्शन करत सर्वप्रथम प्लेऑफमध्ये उडी घेतली होती. पुढे प्लेऑफमध्येही आपला विजयरथ कायम ठेवत गुजरातने अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्सने पराभव करत गुजरातने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. या पराक्रमानंतर गुजरात संघाने हॉटेलमध्ये परतल्यानंतर जल्लोष साजरा केला आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

गुजरात संघाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये परतल्यानंतर किताब जिंकल्याचा (Celebration Of IPL Win) जोरदार आनंद साजरा केला. केक कापून विजयाचा आनंद साजरा केला गेला. गुजरात संघाच्या हॉटेलमध्ये ट्रॉफी आवा दे, असे लिहिलेला मोठा केक तयार करून ठेवण्यात आलेला. संघाने अंतिम सामना जिंकल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू हॉटेलमध्ये परतले, तेव्हा त्यांनी हा केक कापून आनंद साजरा केला. राशिद खान आणि मोहम्मद शमी कर्णधार हार्दिकच्या (Hardik Pandya) चेहऱ्यावर केक लावतानाचा फोटो गुजरातचे सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

https://www.instagram.com/p/CeKFEG8jv4q/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान गुजरात संघाच्या (IPL 2022 Winner) विजयानंतर कर्णधार हार्दिकने आपली प्रतिक्रियाही दिली आहे. आम्ही संघाच्या रूपात जे काही केले आहे, त्याची आठवण पुढील पिढ्या काढतील आणि आमच्या कामगिरीला एका उदाहरणाच्या स्वरूपात घेतील.

https://www.instagram.com/p/CeKH3mlB-gf/?utm_source=ig_web_copy_link

हार्दिक म्हणाला की, “हे विशेष असेल कारण आम्ही वारसा तयार करण्याबद्दल बोललो होतो. येणाऱ्या पिढ्या याबद्दल नक्कीच बोलतील. सर्वजण आमची आठवण काढत म्हणतील की, हा तोच संघ आहे, ज्यांनी त्यांच्या आयपीएल यात्रेची सुरुवात केली होती आणि पहिल्याच वर्षी विजेतेपदही पटकावले होते.”

याबरोबरच हार्दिकने त्याचे संघ सहकारी, सपोर्ट स्टाफ यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच गुजरात संघाच्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान गुजरात विरुद्ध राजस्थान (GT vs RR) संघातील अंतिम सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने १८.१ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर राजस्थानचे आव्हान पूर्ण केले आणि ७ विकेट्सने अंतिम सामना जिंकला.

महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

राशिद खानची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू क्रिकेटविश्वात होईल खूप यशस्वी

महाराष्ट्राच्या पैलवानांचा नादच खुळा! इतिहासात पहिल्यांदाच केली ‘ही’ खास कामगिरी

कर्णधार हार्दिकचेही मास्टर धोनीच्या पावलावर पाऊल, ट्रॉफी जिंकल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---