---Advertisement---

दीपक चाहर आणि जयाच्या लग्नाची तयारी जोरात, संगीत अन् मेहंदी कार्यक्रमातील Photo होतायत व्हायरल

On: बुधवार, जून 1, 2022 9:31 AM
Deepak Chahar and Jaya Bharadwaj
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर बुधवारी (०१ जून) त्याची प्रेयसी जया भारद्वाज हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. काही निवडक लोकांच्या उपस्थितीत आग्रा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये तो लग्न करणार आहे. लग्नापूर्वी मंगळवारी (३१ मे) झालेल्या त्यांच्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आग्रामधील फतेहबाद रोड स्थित पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता मेहंदीच्या कार्यक्रमाला (Mehendi Ceremony) सुरुवात झाली होती. त्यानंतर संगीताचा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान दीपक (Deepak Chahar) लाल रंगाच्या पोषाखात दिसला. तर जयाने (Jaya Bhardwaj) निळ्या रंगाचा घागरा घातला होता. या दोघांचे मेहंदीच्या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दीपकचा भाऊ राहुल चाहरनेही मेहंदी कार्यक्रमातील फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ठेवले आहेत. राहुल त्याची पत्नी ईशानीसंगे मेहंदीच्या कार्यक्रमाला गेला होता.

एमएस धोनीही लावणार उपस्थिती
बुधवारी म्हणजेच १ जून रोजी सकाळी १० वाजता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता लग्नसोहळा सुरू होईल. लग्नानंतर हॉटेलच्या कॅम्पसमध्येच वरातही काढली जाणार असल्याचे समजत आहे. यासाठी आग्रामधील प्रसिद्ध सुधीर बँडला बोलावले गेले आहे.

लग्नसोहळ्याला अविस्मरणीय बनवण्यासाठी चाहर आणि जयाने डान्सचा भरपूर सरावही केला आहे. तसेच दोन्ही कुटुंबांनीही फिल्मी गाण्यांवर डान्स परफॉरमन्सची तयारी केली आहे. चाहरच्या लग्नासाठी मोठमोठे क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि पत्नी साक्षी यांच्या येण्याची शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळत असल्याने धोनीला लग्नासाठी खास आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच विराट कोहली, रोहित शर्मासहित आणखी काही क्रिकेटपटूंनाही लग्नाचे आमंत्रण देण्यात आले असल्याचे समजत आहे.

लग्नात बनणार नानाविध प्रकारचे जेवण
चाहरच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. यामध्ये ब्रज, अवधी, मुगलाई, पंजाबी, साउथ इंडियन खाद्यपदार्थांसह थाई आणि इटालियन जेवणही असेल. तसेच आग्रामधील प्रसिद्ध चाटचा स्टॉलही लावण्यात येणार आहे. यामध्ये पाणीपुरी, दही भल्ला, चाट पापडी, कुल्फी, पावभाजी असेल. मिठाईमध्ये हाथरसची प्रसिद्ध रबडी असेल.

महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

विवादात अडकला एमएस धोनी, बिहारमध्ये कॅप्टनकूल विरोधात FIR दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

अबब! २० षटकांच्या आयपीएलमध्ये मुंबईने १४६ धावांच्या अंतराने जिंकलाय सामना, पाहा असे टॉप-३ सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---