मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे 7 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तान संघाविरुद्ध 3 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ग्लेन मॅक्सवेल होता. खरं तर, त्या सामन्यात अफगाणिस्तानने जवळपास विजय मिळवला होता, पण मॅक्सवेलने आपल्या विस्फोटक खेळीने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावत ऑस्ट्रेलियाला विजयी केले. मात्र, मॅक्सवेलने ही कमाल केली तरी कशी? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
अशात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्या खेळीबाबत मोठा खुलासा झाला आहे. हा खुलासा इतर कुणी नाही, तर मॅक्सवेलवर उपचार करण्यासाठी मैदानात पोहोचलेल्या फिजिओने केला आहे. त्याने सांगितले की, मॅक्सवेलने क्रॅम्पमुळे वैतागून हार मानली होती, पण एका सल्ल्याने मॅक्सवेल पुन्हा खेळू लागला.
रोमहर्षक विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा फिजिओ निक जोन्स (Nick Jones) याने मॅक्सवेलविषयी मोठा खुलासा केला. त्याने सांगितले की, मैदानावर हार मानलेला मॅक्सवेल कशाप्रकारे उभा राहिला आणि चौकार-षटकारांची बरसात केली. जोन्सने सांगितले, मॅक्सवेल जमिनीवर झोपल्यानंतर तो जेव्हा मैदानावर पोहोचले, तेव्हा मॅक्सवेल त्याला म्हणाला की, ‘मी आता खेळू शकणार नाही, मला निवृत्त होण्याची गरज आहे.’ क्रॅम्पमुळे मॅक्सवेलने हार मानली होती, पण जोन्स त्याला म्हणाला की, ‘तू जमिनीवर झोपला आहे, त्यामुळे क्रॅम्प संपूर्ण शरीरात पसरत आहे. तू कसा तरी उभे राहण्याचा प्रयत्न कर.’
फिजिओने सांगितली पद्धत
पुढे बोलताना फिजिओ म्हणाला, ‘तू दोन्ही पायांमधील अंतर जास्त ठेवू नको, हळूहळू धाव घेण्यासाठी पळ. यामुळे तुला आराम मिळेल, तू झोपला आहे, त्यामुळे जास्त वेदना होत आहेत.’ त्यानंतर मॅक्सवेल आणि ऑस्ट्रेलियन कर्णधाराने फिजिओच्या सल्ला ऐकला आणि मॅक्सवेलला खेळू दिले. यामुळे झाले असे की, मॅक्सवेलने शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले.
Against the odds 🙌
The stats behind one of the greatest ODI knocks ever 📲 https://t.co/5WGT8lTBlU pic.twitter.com/Vmikjr4DfU
— ICC (@ICC) November 8, 2023
मॅक्सवेलने या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 128 चेंडूत नाबाद 201 धावांची द्विशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. मॅक्सवेलला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. तो ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला. तसेच, आव्हानाचा पाठलाग करताना विश्वचषकात द्विशतक ठोकणाराही तो पहिलाच फलंदाज बनला. (physiotherapist nick jones reveals how all rounder glen maxwell play aus vs afg odi world cup 2023)
हेही वाचा-
कुणी तरी येणार येणार गं! विराट लवकरच दुसऱ्यांदा बनणार बाबा, बेबी बंपमध्ये दिसली अनुष्का- Video
वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा करिष्मा कायम! सलग पाचव्या वर्ल्डकपमध्ये दाखवला दम