नवी दिल्ली। सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात रोहित शर्मा असा एक भारतीय फलंदाज आहे, ज्याच्याविरुदध कोणत्याही गोलंदाजाला गोलंदाजी करणे चिंतेत टाकू शकते. परंतु असे असले तरीही रोहितची विकेट घेणे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असेल. असाच एक पाकिस्तान संघाचा युवा गोलंदाज आहे नसीम शाह. रोहितची विकेट घेणे हे त्याचे स्वप्न आहे. त्याने एका मुलाखतीत आपल्या स्वप्नाचा उल्लेख केला आहे.
त्याचा असा विश्वास आहे, की रोहितकडे (Rohit Sharma) सर्वप्रकारचे चेंडू खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याची विकेट घेणे नसीमसाठी (Naseem Shah) स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे असेल.
“रोहितकडे प्रत्येक शॉट खेळण्याची क्षमता आहे. मग तो चेंडू शॉर्ट असो किंवा गुड लेंथ. त्याची आकडेवारी त्याच्याबद्दल खूप काही सांगून जाते. त्याची विकेट घेणे माझ्यासाठी माझे स्वप्न सत्यात उतरल्याप्रमाणे आहे,” असे एका मुलाखतीत बोलताना नसीम म्हणाला.
नसीमने हे देखील म्हटले, की ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथची (Steve Smith) विकेट घेणे हेसुद्धा त्याच्यासाठी आनंदाची बाब असेल. तो म्हणाला, “स्मिथ खूपच वेगळ्याप्रकारचा फलंदाज आहे. त्याची विकेट घेणे माझ्यासाठी आनंदाची बाब असेल. मला यापूर्वीही स्मिथला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु त्याची विकेट घेणे माझ्यासाठी एक चांगला अनुभव असेल.”
पुढील महिन्यापासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या मालिकेत पाकिस्तान संघात नसीमची निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अलीने (Haider Ali) रोहित आपला आदर्श असल्याचे सांगितले होते. त्याने म्हटले होते, की त्याला रोहितप्रमाणे प्रत्येक चेंडूवप शॉट मारायचा आहे. तसेच त्याच्याप्रमाणे सातत्याने आपल्या संघासाठी द्विशतके ठोकायची आहेत.
यावर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या अलीची इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात निवड केली आहे.
नसीमने आतापर्यंत पाकिस्तान संघाकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६.८४ च्या सरासरीने एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आपल्या शेवटच्या सामन्यात सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारे २ भारतीय कर्णधार
-भारतातील या दोन ठिकाणी होणार आयपीएलपुर्वी टीम इंडियाचा ट्रेनिंग कँप?