---Advertisement---

भारतातील या दोन ठिकाणी होणार आयपीएलपुर्वी टीम इंडियाचा ट्रेनिंग कँप?

On: शनिवार, जुलै 18, 2020 1:48 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी सामन्याच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. याबरोबरच अधिकतर देशांमध्ये प्रशिक्षण शिबीरदेखील सुरु झाले आहेत. परंतु भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर अद्याप सुरु करता आलेले नाही. असे असले तरीही भारतीय संघाचे प्रशिक्षण शिबीर (ट्रेनिंग कँप) भारताबाहेर युएईमध्ये होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त अहमदाबाद आणि धरमशाला हे भारतातील दोन ठिकाण आहेत, जिथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाऊ शकते.

काल (१७) झालेल्या बीसीसीआयच्या अपेक्स काऊंसिलच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

भारतात (India) कोरोना व्हायरसची वाढत असलेली प्रकरणे पाहता आयपीएलचे आयोजन दुबई येथे सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपासून ते नोव्हेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटपटूही दुबईमधील प्रशिक्षण शिबीराचा भाग असू शकतात. बोर्डाच्या अपेक्स काऊंसिलच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली आहे. परंतु आयपीएलची संचालन परिषद यावर अंतिम निर्णय घेईल.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले, “आयपीएलचे आयोजन दुबईमध्ये झाले, तर भारतीय क्रिकेटपटू तिथे सराव करतील. तिथे चांगली पायाभूत सुविधा आहे. आयपीएल दुबईमध्ये होण्याची अधिक शक्यता आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) भारतात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे.”

त्यांनी पुढे म्हटले, की प्रशिक्षण शिबीर धरमशाला (Dharamshala) किंवा मोटेरा स्टेडिअम, अहमदाबाद (Motera Stadium, Ahmedabad) येथेही होऊ शकतात. परंतु कोरोना व्हायरसमुळे दुबई (Dubai) हे ठिकाण सर्वात सुरक्षित आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-तुमच्या कोणत्याही टॉप खेळाडूच्या माझ्याशी स्पर्धा घ्या; मग पाहूच, भज्जीने दिले खुले आव्हान

-दक्षिण आफ्रिकेत होतोय ३ संघात अनोखा सामना; त्या सामन्याबद्दल जाणून…

-आनंदाची बातमी: २६ सप्टेंबरपासून या देशात होणार आयपीएलला सुरुवात?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---